आजचा वाढदिवस : खासदार उदयनराजे भोसले - Today's birthday: MP Udayanraje Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : खासदार उदयनराजे भोसले

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

उदयनराजे यांची संपूर्ण सातारा नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज म्हणून क्रेझ आहे. तरूणांच्या गळ्यातील ते ताईत असून त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्ह्यात कोट्यवधी रूपयांची विकास कामे केलेली आहेत. 

साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. त्यांचा जन्म नाशिक येथे झाला. ते इंजिनिअर आहेत. सातारा पालिकेचे नगरसेवक, आमदार, महसूल राज्यमंत्री तसेच तीन वेळा राष्ट्रवादीचे खासदार आणि सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा सर्वाधिक संघर्ष
राजघरण्याशीच राहिला.  

त्यांची राजकिय कारकिर्द सातारा पालिकेत नगरसेवक पदापासून झाली. १९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९६ ला त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. १९९८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीत त्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पराभव करून ते भाजपचे आमदार झाले.

त्यांना महसूल राज्यमंत्री हे पद देण्यात आले. १९९९ मध्ये त्यांचा अभयसिंहराजेंकडून विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. २००६ मध्ये साताऱ्यात दोन राजघराण्यांचे मनोमिलन झाले. त्यानंतर झालेल्या २००९ व २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ते सातारा मतदारसंघातून सलग तीन पंचवार्षिक राष्ट्रवादीतून खासदार झाले. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव भरून काढण्यासाठी त्यांना भाजपने राज्यसभेवर घेतले आहे. उदयनराजे यांची संपूर्ण सातारा नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज म्हणून क्रेझ आहे. तरूणांच्या गळ्यातील ते ताईत असून त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्ह्यात कोट्यवधी रूपयांची विकास कामे केलेली आहेत. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख