आजचा वाढदिवस : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले - todays Birthday : MLA Shivendraraje Bhosale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

आजचा वाढदिवस : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 30 मार्च 2021

2004 मध्ये ते राष्ट्रवादीतून साताऱ्याचे आमदार झाले. त्यावेळपासून ते आजअखेर ते सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असूनअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत.

 सातारा : मूळचे साताऱ्याचे असलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा  जन्म कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण  संजीवन विद्यालय पाचगणी येथे झाले. भोसला मिलिटरी स्कूल  नाशिक येथे त्यांनी एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले आहे. अजिंक्यतारा  सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला.

अभयसिंहराजे भोसले ऊर्फ भाऊसाहेब महाराजांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादीतून साताऱ्याचे आमदार झाले. त्यावेळपासून ते आजअखेर ते सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असूनअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आहेत.

अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे मार्गदर्शक संचालक आहेत. तसेच जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष, टेबल टेनिस संघटनेचे सदस्य आहेत. कॉलेज जीवनात ते बास्केट बॉलचे खेळाडू होते. त्यांना बंदुकीचा तसेच विविध प्रकारच्या गाड्या व जातिवंत श्वानांचा छंद आहे.

अभयसिंहराजे भोसले यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंना खंबीरपणे साथ दिली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी विकास कामांच्या मुद्द्यांवर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानिवडणूकीत ते सातारा-जावळी मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जरी ते भाजपचे आमदार असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख