आजचा वाढदिवस : मकरंद पाटील (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदारसंघ)

2009 मध्ये वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदारसंघातून प्रथम आमदार म्हणूननिवडुन आले. त्यानंतर २०१४, २०१९ असे सलग तीन पंचवार्षिक याच मतदारसंघातून आमदार होत त्यांनी हॅटट्रीक केली आहे.राष्ट्रवादीचे वाई मतदारसंघातील ''जननायक'' म्हणून ते ओळखले जातात.
MLA Makrand Patil
MLA Makrand Patil

वाई : महाबळेश्‍वर-खंडाळा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांचे मुळगाव बोपेगांव (ता. वाई) असून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअर आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव असल्याने पाटील घराण्याचा राजकीय वारसा त्यांच्या मागे आहे. कॉलेज जीवनात ते विद्यार्थी प्रतिनिधी होते. 

त्यानंतर बोपेगावचे सरपंच झाले. ओझर्डे गटातून जिल्हा परिषद सदस्य झाले. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून त्यांनी मदन भोसले यांच्या विरोधात निवडणुक लढली व तेथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदारसंघातून प्रथम आमदार म्हणून निवडुन आले. त्यानंतर २०१४, २०१९ असे सलग तीन पंचवार्षिक याच मतदारसंघातून आमदार होत त्यांनी हॅटट्रीक केली आहे. राष्ट्रवादीचे वाई मतदारसंघातील ''जननायक'' म्हणून ते ओळखले जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com