वर्धा येथे सुरू झाले रेंमडिसिव्हिरचे उत्पादन, नितीन गडकरींनी केली पाहणी...

सतत काम करणाऱ्या या कामगारांच्या परिश्रमातून हे इंजेक्‍शन निर्माण करण्यात येणार आहे. ते केंद्राच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्यांच्याकडून गरजेनुसार ते राज्यातील जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये आजपासून रेमडेसिव्हिर (Remdisivir) या इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. यामुळे विदर्भ आणि महाराष्ट्रातील (Vidarbha and Maharshtra) रुग्णांना फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये या कंपनीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या कंपनीला रेमडेसिव्हिरचे उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, (company should be allowed to produce ramadesivir) यासाठी गडकरींनी विशेष प्रयत्न केले होते. 

जिलेड या अमेरिकन कंपनीकडे रेमडीसीविरचे पेटंट असून या कंपनीने भारतात ७ विविध कंपन्यांना या इंजेक्शन निर्मितीचा परवाना दिला आहे. यातील एक हेट्रो फार्मा (Hetro Pharma) या हैदराबाद येथील कंपनीसोबत वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायन्सेसने करार केला. गडकरी यांच्यामुळेच हा करार होऊ शकला. लोन बेसिसवर हेट्रो फार्मा वर्धा येथील जेनेटिक फार्मातून रेमडीसीविरचे उत्पादन करीत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडूनही गडकरींनी वर्धा (Wardha) येथील कंपनीसाठी मंजुरी मिळवली. या इंजेवशनच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल विदेशातून येतो. अथक प्रयत्नातून हा कच्चा माल वर्धा येथे आणण्यासाठी यश मिळाले आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर आज हे उत्पादन सुरू झाले आहे. (The product has been launched today after all sorts of tests) येत्या रविवारपर्यंत रेमडीसीविरचे १ लाख इंजेक्शन लोकांपर्यंत पोहोचतील. दररोज 30 हजार रेमडीसीविरचे उत्पादन होणार आहे.

कोरोना काळात उपचाराकरिता रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे त्याची मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत सध्या उत्पादन कमी आहे. सद्यःस्थितीत २५ हजार इंजेक्‍शन निर्माण करण्याकरिता आवश्‍यक असलेले कच्चे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यानुसार हे काम करण्यात येणार आहे. या कामाकरिता तांत्रिक आणि इतर सर्व संवर्गातील एकूण शंभर कामगार कार्यरत राहणार आहेत. सतत काम करणाऱ्या या कामगारांच्या परिश्रमातून हे इंजेक्‍शन निर्माण करण्यात येणार आहे. ते केंद्राच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्यांच्याकडून गरजेनुसार ते राज्यातील जिल्ह्यांना देण्यात येणार आहेत.  

महाराष्ट्राला प्राथमिकता देणार 
सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली कोरोना परिस्थिती विदारक आहे. या काळात कोरोनाबाधितांना औषधोपचार महत्त्वाचा आहे. यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन अत्यावश्‍यक झाले आहे. परंतु त्याची सर्वत्र टंचाई निर्माण झाली आहे. याच कारणाने वर्ध्यात त्याची निर्मिती करण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार उत्पादन सुरू झाले आहे. ते लवकरच केंद्राच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. (It will be handed over to the Center soon) असे असले तरी त्याचा महाराष्ट्राला सर्वाधिक उपयोग होईल, असा प्रयत्न राहणार आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com