उपराजधानीत शिवसैनिकांना मिळाला सेनापती, खरी ठरली माजी जिल्हाप्रमुखांची शंका  - shiv sainiks got senapati in nagpur former district chiefs suspicion came true | Politics Marathi News - Sarkarnama

उपराजधानीत शिवसैनिकांना मिळाला सेनापती, खरी ठरली माजी जिल्हाप्रमुखांची शंका 

राजेश चरपे 
गुरुवार, 30 जुलै 2020

कडवचे खंडणी प्रकरण कटकारस्थान आहे, काही अमराठी नेते जाधव यांना हटवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे अप्रत्यक्ष आरोप करीत होते. विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनीसुद्धा अशाच आशयाचे वक्तव्य केले होते. त्यामुळे मराठी-अमराठी वादाला पक्षात तोंड फुटले होते.

नागपूर : शिवसेनेचा निलंबित खंडणीबाज शहरप्रमुख मंगेश कडवला अटक झाल्यानंतर शहरातील संघटन सैरभैर झाले होते. तत्कालिन जिल्हाप्रमुख, माजी खासदार यांचेही अधिकार गोठवले होते. त्यामुळे संघटनेत मरगळ आली होती. सेनापतीविना शिवसैनिक चाचपडत होते. तेव्हा ‘सरकारनामा‘ने ‘उपराजधानीत शिवसेनेला हवाय नव्या दमाचा कर्णधार‘, ही बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर तातडीने हालचाली झाल्या आणि बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत रात्री उशिरा दुष्यंत चतुर्वेदी यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली. 

शहरप्रमुख मंगशे कडव खंडणी व फसवणुकीच्या प्रकरणात अडकल्यानंतर त्याची तातडीने हकालपट्टी करण्यात आली होती. पालक म्हणून जिल्हाध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव यांनाही यास जबाबदार धरून त्यांचे जिल्हाध्यक्षपद गोठविले होते. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांची सेना जिल्ह्यात सेनापतीविना होती. दरम्यान कडवचे खंडणी प्रकरण कटकारस्थान आहे, काही अमराठी नेते जाधव यांना हटवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे अप्रत्यक्ष आरोप करीत होते. विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनीसुद्धा अशाच आशयाचे वक्तव्य केले होते. त्यामुळे मराठी-अमराठी वादाला पक्षात तोंड फुटले होते. कार्यकारिणी नेमताना मराठी-अमराठी कोण? हे संपर्क प्रमुखांना कळले नाही का? असाही आरोप त्यांच्यावर पक्षांतर्गत विरोधकांमार्फत केला जात होता. यास वेगळे वळण लागू नये म्हणून सर्वांची मौन बाळगणे पसंत केले होते. असे असले तरी दुष्यंत चतुर्वेदी यांची समन्वयकपदी नियुक्त झाल्याने जाधव समर्थकांची शंका खरी ठरल्याचे बोलले जाते. 

दुष्यंत चतुर्वेदी यवतमाळ स्थानिक स्वराज्य

-->