अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव असल्याने वाबळेवाडीच्या शाळेविरोधात मोहीम

या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा फडणवीस सरकारने दिला तर आंतरराष्ट्रीय शाळेची संकल्पना विद्यमान सरकारने रद्द करुन शाळेला नियमित जिल्हा परिषद शाळेच्या दर्जात आणून ठेवली.
Bawankule
Bawankule

शिक्रापूर : लोकवर्णणीतून आंतरराष्ट्रीय शाळेचे स्वप्न एका छोट्या वाबळेवाडीने जगापुढे वास्तवात मांडले आहे. शाळेचे नाव अटलबिहारी वाजपेयी असे असल्यानेच वाबळेवाडी शाळेच्या चौकशा सुरू केल्याची खरमरीत टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Ex minister Bawnkule says due to politics Wabalewadi school targeted) 

वाबळेवाडी शाळेचे प्रकरण सध्या चांगलेच तापलेले आहे. शाळेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी पाच सदस्यिय समितीच्या वतीने सुरू आहे. त्यातच या शाळेला भेट देवून भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यापर्यंत पोहचविले. या शिवाय बारामतीच्या शिक्षण संघटनेनेही वाबळेवाडीच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहचविले. याच आता माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी उडी घेत हे प्रकरण थेट भाजपाची अस्मिता आणि भाजपाचे जेष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाशी जोडून राजकीय गदारोळाकडे वळविले आहे.

या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा फडणवीस सरकारने दिला तर आंतरराष्ट्रीय शाळेची संकल्पना विद्यमान सरकारने रद्द करुन शाळेला नियमित जिल्हा परिषद शाळेच्या दर्जात आणून ठेवली. पर्यायाने शाळेच्या एकूणच आर्थिक व्यवहारांच्या चर्चेचा विषय जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येवून पडला आहे. याच अनुषंगाने शाळेबाबत स्थानिकांमध्ये संवेदनशीलतेच्या भावना असतानाच काल (ता.३०) माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिक्रापूरात आले होते. भाजपा कार्यलयातील एक कार्यक्रम उरकून बाहेर निघताना त्यांनी पत्रकारांशी वाबळेवाडीचा विषय छेडला व वरील प्रतिक्रिया दिल्या. 

त्यांनी पुढे सांगितले की, शिक्षणासाठी लोकवर्गणीचा एक आदर्श नमूना म्हणून वाबळेवाडी शाळा संपूर्ण राज्यात आदर्श आहे. मात्र स्थानिक, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणामुळे अशा एखाद्या संस्थेला कशी बदनामी सहन करावी लागते त्याचे उदाहरण म्हणूनही वाबळेवाडी शाळेकडे पहावे लागेल. काहीही झाले तरी आम्ही एवढी मोठी संस्था उध्वस्त होवू देणार नाही. मी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे संपूर्ण प्रकरण तर पोहचविणार आहेच शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेही या शाळेबद्दलची वस्तुस्थिती मांडेन. वाबळेवाडी शाळा आणखी जोमाने प्रगती करेल यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबतचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मिडीयावर त्यांनी व्हायरल केला आहे. दरम्यान यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, अनुप मोरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, अ‍ॅड.धर्मेद्र खांडरे, सतीश पाचंगे, शिवजीराव भुजबळ, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पंडीत भुजबळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहीत खैरे, सुरज चव्हाण, रघूनंदन गवारे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com