जातपंचायतीने टाकले वाळीत; भांडण मिटवण्यासाठी लाचही मागितली..

हिंदू गोंधळी समाजातील हा प्रकार असून पिडित शरणीदास भोसले याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
जातपंचायतीने टाकले वाळीत; भांडण मिटवण्यासाठी लाचही मागितली..
Solapur Jat panchyat News

सोलापूर ः नवरा-बायकोच्या कौटुंबिक भांडणात हस्तक्षेप करत जातपंचायतीने या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा आणि कुटुंबाला दोन लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Jat Panchayat has been in the baycott for three years; He also demanded a bribe to settle the dispute.)

विशेष म्हणजे या कुटुंबावर जातपंचायतीने २०१८ पासून बहिष्कार टाकल्यामुळे आजारी आईला दवाखान्यात भेटण्यासाठी आपल्या भावाला मज्जाव केल्याचेही समोर आले आहे. (Solapur police Filed Fir and Areest four person)

हिंदू गोंधळी समाजातील हा प्रकार असून पिडित शरणीदास भोसले याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोलापुरात जातपंचायतीचा अन्यायकारक कारभार समोर  आला आहे. शरणीदास भोसले नामक व्यक्तीच्या कौटुंबिक वादात हस्तक्षेप करून शरणीदास यांना जातीतून बहिष्कृत करण्यात आले होते.

शरणीदास हे हिंदू गोंधळी समाजाचे असून त्यांच्या बायकोपासून वेगळे राहत आहेत.  मात्र कौटुंबिक भांडण मिटवण्यासाठी तसेच परत समाजात घेण्यासाठी पंचांनी  आपल्याला दोन लाख रुपये मगितल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. शरणीदास यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये आजारी असतांना त्यांच्या भावाने भीतीपोटी भेटुसुद्धा दिले नाही.

तसेच, शरणीदास यांच्या मुलीनेसुद्धा जातपंचयतीविरुद्ध आवाज उठवत जातपंचायत कायमची बरखास्त करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणात शरणीदास यांनी केलेल्या तक्रारीवरून  एमआयएमडीसी  पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in