रश्मी शुक्लांवर होणारे आरोप खोटे असतील तर आम्ही त्यांच्यासोबत... 

काँग्रेसच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या रश्मी शुक्ला यांच्याबद्दलच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.
Congress Mla Praniti Shinde- Rshami Shukla News Solapur
Congress Mla Praniti Shinde- Rshami Shukla News Solapur

सोलापूर : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे.
विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एक ही संधी सोडताना दिसतं नाहीत.
या सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादामध्ये आता काँग्रेसने उडी घेतली आहे.
काँग्रेसच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या रश्मी शुक्ला यांच्याबद्दलच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

प्रणिती शिंदे यांना रश्मी शुक्ला यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र या प्रकरणाची कारवाई अद्याप सुरू आहे.कारवाई पूर्ण झाल्यानंतर यावर भाष्य करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सोलापूरात पत्रकारांशी बोलत होत्या.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या लीक झालेल्या अहवालाचा.
त्यांचा अहवाल लीक झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी शुक्ला यांच्याविरोधात एकवटल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र रश्मी शुक्लांच्या पाठीशी उभे राहण्याचा मानस बोलून दाखवला की काय,अशी चर्चा त्यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com