भुजबळांना या वयात खोटे बोलावे लागले, याचे मला वाईट वाटले..

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, की या निवडणुका पुढे ढकलाव्या. राज्य सरकारने ही भूमिका घेतली तर न्यायालय ऐकेल.
Bjp Leader Chandrashekhar Bawankule- Ncp Chagan Bhujbal News Pune
Bjp Leader Chandrashekhar Bawankule- Ncp Chagan Bhujbal News Pune

लोणावळा (जि. पुणे) ः आपण आज सर्व ओबीसींच्या भल्यासाठी आलो आहोत. फडणवीसांनी आम्हाला कालच सूचना दिल्या की, राज्य सरकारला सहकार्य करा, त्यासाठीच पंकजा मुंडे आणि मी आलो. आम्ही तुमच्या प्रत्येक भूमिकेच्या सोबत आहोत. पण छगन भुजबळ जे काल बोलले, त्याबद्दल मला फार वाईट वाटले. त्यांना या व्यासपिठावर आणि या वयात का खोटे बोलावे लागले, हे कळत नाही. (I felt bad that Bhujbal had to lie at this age, Said, Bjp Leader Chandrashekher Bavankule)  यासंदर्भात मी स्वतः आणि आशिष जयस्वाल केव्हाही समोरासमोर भुजबळ यांच्याशी बोलायला तयार आहोत, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

लोणावळा येथे आयोजित ओबीसी आरक्षण सर्वपक्षीय परिषदेत बानवकुळे यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात सविस्तर माहिती दिली. ( Ncp Minister Chagan Bhujbal) ती देत असतांनाच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काॅंग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार व राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

बावनुकळे म्हणाले, महाराष्ट्रातील ओबीसींवर जो अन्याय झाला आहे, तो दूर करण्यासाठी आयोजक सर्वपक्षीय नेत्यांना याठिकाणी बोलावलं आहे. (Bjp Leader Pankaja Munde) त्यासाठीच आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. या परिषदेकडे राज्यातील १२ कोटी जनतेचे लक्ष लागले आहे. इतिहासामध्ये ओबीसी समाजावर या पद्धतीने आरक्षण जाण्याची वेळ येणे, ही काळी घटना आहे.  या चळवळीचा मोठा साक्षीदार मी आहे.  २०१८ मध्ये कुणी प्रकरण केले, याचा विचार केला, तर वादाचा विषय होईल.

२०१८ मध्ये उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी म्हटले की, ११ मे २०१० ओबीसी आरक्षणाकरिता के. कृष्णमूर्तींनी जो निकाल दिला, त्यामध्ये आरक्षण जास्त असल्याचे म्हटले होते. घटनापिठाचा आदेश हा कायदा झाला, याचिकाकर्त्याने आव्हान दिले, त्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी होत्या.  ५० टक्क्याच्या वर जायला नको, आदीवासी, एससी, एसटी लोकसंख्येप्रमाणे द्यावे. उरलेले मागासवर्गीयांना दिले. आम्ही त्यावेळी उच्च न्यायालयाला पटवून सांगितले. पण न्यायालयाने ते फेटाळले.

तेव्हा आम्ही रात्र जागून काढली..

२०१९ मध्ये उच्च न्यायालयात प्रकरण आल्यानंतर सरकारने मला बघण्याचा आदेश दिला. संजय कुटे, राम शिंदे आम्ही मिळून या प्रकरणात लक्ष घातले. २०१९ मध्ये न्यायालयाच्या विरोधात जाण्याची वेळ आली होती. ३० जुलैला आम्ही रात्र जागून काढली, ३१ जुलैला सकाळी राज्यपालांच्या घरी गेलो आणि सही आणली. वटहुकूम काढला की, आरक्षण योग्य आहे. ते सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. त्यानंतर ५ जिल्ह्यांतील निवडणुकांना न्यायालयाने परवानगी दिली. त्या निवडणुका झाल्या आणि मग सरकार बदलले.

नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झाले. तेव्हा शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल नाना पटोलेंना भेटले.  मी स्वतः छगन भुजबळ यांना भेटलो.  १९.१२.२०१९ ला न्यायालयाचा आदेश आला की, के. कृष्णमूर्तींच्या आदेशाप्रमाणे कृती करा,  त्याप्रमाणे आपण आता पुढे गेलं पाहीजे, असेही बावनकुळे म्हणाले. २०११ मध्ये जनगणना झाली, जातीनिहाय जनगणनेचा प्रयत्न झाला. तो डाटा मिळविण्याचा आम्हीही खुप प्रयत्न केला. पण तो डाटा वापरू नये किंवा कुणाला देऊ नये, असा तेव्हाच्या युपीए सरकारने निर्णय घेतला.

वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात दोन ग्रामपंचायतींनी इम्पेरिकल डाटा तयार केला. वडेट्टीवार म्हणाले, या राज्यात जर निवडणुका होतील, तर ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाही. यासाठी त्यांचे कौतुक झाले आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. कोरोना आहे, डेल्टा प्लस येऊ घातला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, की या निवडणुका पुढे ढकलाव्या.

या व्यासपीठावरून राजकारण नको..

राज्य सरकारने ही भूमिका घेतली तर न्यायालय ऐकेल आणि आपल्याला पाच-सहा महिने वेळ मिळेल. त्या वेळात आपण स्वतःही डाटा तयार करू शकतो आणि ओबीसींवर आलेले हे संकट टळेल. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका झाल्या, तर भविष्यातील २०२२ मध्ये होणाऱ्या ८५ टक्के निवडणुकांना बिना ओबीसी आरक्षणाने जाण्याची भीती आहे आणि असे होऊ नये, असा आपला प्रयत्न असला पाहिजे. आम्ही भाजप आपल्या पाठीशी उभा करू.

आम्हा सर्वांना एकत्र आणून जी वज्रमुठ तयार केली, ही ताकत वापरून घ्या. हे व्यासपीठ कुणी राजकीय फायद्यासाठी कुणी वापरू नये, असे आवाहनही शेवटी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.  व्यासपीठावर विजय वडेट्टीवार, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पंकजा मुंडे, अण्णाजी डांगे, बबनराव तायवाडे, आमदार राजेश राठोड, बाळासाहेब सानप. बालाजी शिंदे यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com