पोलिस आयुक्त म्हणाले, पाॅपकाॅर्न खात घरी पिक्चर बघा..

ट्विटरनंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा पुणेकरांशी इन्स्टाग्रामद्वारे "आस्क मी एनिथींग'द्वारे मनमोकळा संवाद.
police commissinor Appeal punkar news
police commissinor Appeal punkar news

पुणेः ट्विटरवरील व्हिडीओ, छायाचित्रांद्वारे पुणेकरांचे पोलिसांशी भावनीक नाते जोडणाऱ्या पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यापुढे जात थेट इन्स्टाग्रामवर "आस्क मी एनिथींग' असे सांगत पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी विशेषत महिलांनी त्यांना विविध प्रश्न विचारत बोलते केले. (Pune Police Commisssioner Amitabh Gupta Interact Punekar On Instagram) यातील गरज भासल्यास पोलिस महिलांना खरंच मदत करतात का? या प्रश्‍नावर "कोई शक, असे फिल्मी स्टाईल उत्तर त्यांनी दिले. महिलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे खपवुन घेतले जाणार नाही', अशा शब्दात पोलिस आयुक्तांनी महिलांना विश्‍वास दिला.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुण्याचा कारभार हाती घेतला तेव्हापांसून अवैध धंदे व सामुहिक गुन्हेगारीचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गुप्ता यांचा गुन्हेगारांवर चांगलाच जरब असल्याचेही दिसून आले आहे. ( Gupta Take The Charge As A police Commissinor Crime in Pune Low)  गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असतांना त्यांनी पुणेकरांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे. यासाठी त्यांनी ट्विटरद्वारे लोकांच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा आणि कोरोना व विशेषतः लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांच्या नागरिकांकाडून काय अपेक्षा आहेत, याची चर्चा घडवून आणली. 

संचारबंदी असतानाही नागरीक पोलिासांना कशा पद्धतीने भन्नाट कारणे सांगून घराबाहेर पडतात, याचे काही व्हिडीओ सर्वाधिक चर्चिले गेले. तसेच ट्विटरवरील काही खास संवाद आणि छायाचित्रांची देखील पुणेकरांमध्ये चर्चा दिसून आली. पोलिस आणि नागरिक यांच्यातील हा संवाद अधिक वाढवण्यासाठी गुप्ता यांनी ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामची देखील मदत घेतली आहे. इन्स्टाग्रामाद्वारे देखील ते नागरीकांशी संवाद साधत आहेत. 

यासाठी त्यांनी आठवड्यातील मंगळवार व बुधवार असे सलग दोन दिवस नागरीकांना भरपूर वेळ देत त्यांच्यांशी मुक्त संवाद साधला. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांना कधी मनमोकळेपणाने तर कधी विनोदी शैलित उत्तर देत त्यांनी हा संवाद अधिक सुखःद केल्याची चर्चा आहे. महिला सुरक्षेच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

आठ हजार लोकांची पसंती

आतापर्यंत  दहा हजारापंर्यत लोकांनी त्यांच्या "आस्क मी एनिथींग'ला प्रतिसाद दिला. तर ८ हजार नागरिकांना पोलिस आयुक्तांचा हा  उपक्रम आवडल्याचे नमूद करण्यात आले. तर अडीचशे हून अधिक लोकांनी त्यांना प्रश्न विचारत बोलतेही केले. सायबर फसवणूक, वाढती गुन्हेगारी या संदर्भातील प्रश्न यात अधिक होते. 

"महिला सुरक्षिततेबाबत तुम्हाला शंका आहे का ? जर तुम्हाला तसा अनुभव आला असेल, तर थेट मीच तुमचे कान होईल. महिलांच्या सुरक्षिततेकडे दुलर्क्ष खपवुन घेतले जात नाही.' असे स्पष्ट करत त्यांनी पुणेकर महिलांना एक विश्वासही दिला. (Womans Securety Is My First Proyority syas Gupta) "सावत्र आईने केलेल्या मानसिक छळाचा कसा सामना करू', "सध्याच्या काळात सकारात्मक कसे राहायचे' अशा प्रश्नांना देखील गुप्ता यांनी समर्पक उत्तरे दिली. "वाचन करा, खेळ खेळा, जुने मित्र- कुटुंबीयांशी संवाद साधा, काहीतरी नवीन शिका. घरी राहून पॉपकॉर्न खात चित्रपटांचा आस्वाद घ्या''असे आवाहनही गुप्ता यांनी या संवादामधून केले. 

Edited by : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com