अजित पवारांनी तालुक्याला भरपूर निधी दिला, आता खोड्या करणाऱ्यांना घरी बसवा..

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला.
अजित पवारांनी तालुक्याला भरपूर निधी दिला, आता खोड्या करणाऱ्यांना घरी बसवा..
Minister Datta Bharne-Ajit Pawar-Indapur-pune News

इंदापूर : राज्याची तिजोरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी विक्रमी निधी आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रुसवेफुगवे, गटतट बाजूला ठेवून पक्षसंघटन मजबूत करण्यास प्राधान्य द्यावे. (Ajit Pawar gave a lot of funds to the taluka, now make the pranksters stay at home) खोड्या करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूस ठेवणे गरजेचे असून रुसवे फुगवे करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घरी बसावे, असा इशारा देत सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले.

झगडेवाडी ( ता. इंदापूर ) ग्रामपंचायत सचिवालय, अंगणवाडी,जिल्हापरिषदप्राथमिक शाळा, अंतर्गत रस्ते, विविध मंदिर सभा मंडपाचे उदघाटन (State Minister Dattatray Bharne Pune) तसेच विविधविकासकामांचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले

यावेळी जिल्हापरिषद सदस्य प्रविण माने, हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, प्रशांत पाटील,सचिन सपकळ, महारुद्र पाटील, हनुमंत कोकाटे, अमोल पाटील, दिलीप वाघमारे, दत्तात्रय जगताप, सागर मिसाळ उपस्थित होते.  

यावेळी भरणे म्हणाले, सन २०१२ पर्यंत कामे कमी व उदघाटने जास्त होत होती. आता कामे जास्त होत आहेत, मात्र आपण प्रसिद्धीत कमी पडत आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता जास्त वाजवणे गरजेचे आहे. अनेक तोलामोलाचे कार्यकर्ते पक्षात येण्यास उत्सुक असून आता बेरजेचे राजकारण करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हापरिषद,पंचायत समिती व नगरपरिषद ताब्यात येण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत. 

तालुक्यातील वीज तोडणी संदर्भात राज्याचे वीज मंत्री नितीन राऊत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८०० कोटी रुपयांच्या निविदा १० सप्टेंबर पर्यंत निघणार आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी  निधी कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी उपस्थितांना दिला.

बिझनेस माॅडेल तयार करा..

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, इंदापूर तालुक्यात शेती, गाणे, व्हॅन तयार करणे यामध्ये प्रचंड बौद्धिक संपदा असून त्याचे मार्केटिंग होणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्याचे
आगामी २५ व ५० वर्षाचे बिझनेस मॉडेल तयार करणे गरजेचे असून तालुक्यातील टॅलेंटला वाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी जिल्हापरिषद सदस्य अभिजिततांबिले ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, सरपंच रुपाली झगडे यांची भाषणे झाली. स्वागत उपसरपंच यशोदा राजगुरू तर सुत्रसंचलन अनिल रुपनवर व संतोष गदादे यांनी केले.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in