ड्यूटी नाकारणारे २३ शिक्षक बिनपगारी.. - 23 unpaid teachers refusing duty | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

ड्यूटी नाकारणारे २३ शिक्षक बिनपगारी..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 मे 2021

शहरात एकाचवेळी एक हजार ५० शिक्षक प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करीत आहेत. सर्व्हेसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागाचे जवळपास अडीच हजार शिक्षकांची मदत घेतली जात आहे.

सोलापूर  : आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांना शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिका आयुक्‍तांनी आदेश देऊनही ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या ३७ शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली होती. (Twenty Three unpaid teachers refusing duty) त्यातील १५ शिक्षक आता रूजू झाले असून उर्वरित शिक्षकांनी अजूनही ड्यूटी जॉईन केली नाही. त्यामुळे त्यांना वेतन देऊ नये, असे आदेश आता महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढले जात आहेत.

शहरातील कोरोनाची लाट आटोक्‍यात यावी या हेतूने शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. (Every household in the city is being surveyed with the aim of controlling the corona wave in the city.) त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. परंतु, कोरोनाचा सर्व्हे करतांना ५० ते ५५ वर्षांवरील शिक्षक, को-मॉर्बिड शिक्षकांसह दिव्यांग, २० व ४० टक्‍क्‍यांवरील शिक्षक, शिक्षणसेवक, गर्भवती महिला शिक्षिकांना कोरोना ड्यूटीतून सवलत देण्यात आली आहे.

शहरात एकाचवेळी एक हजार ५० शिक्षक प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करीत आहेत. सर्व्हेसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागाचे जवळपास अडीच हजार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. (The government is providing insurance cover of Rs 50 lakh to government employees.) कोरोना सर्व्हेक्षण अथवा कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगचे काम करताना मयत झालेल्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास शासनाकडून ५० लाखांचे विमा कवच दिले जात आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत पाठवावा लागणार असून त्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

मदतीचा प्रस्ताव पाठविलाच नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घरोघरी जाऊन सर्व्हे करणारे ३२ शिक्षक कोरोना बाधित झाले  (३० मार्च २०२१ पासून) असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश देणाऱ्या महापालिका प्रशासनाने मयत शिक्षकांच्या मदतीचा प्रस्ताव अजूनही पाठविलेला नाही. (The municipal administration has not yet sent a proposal to help the deceased teachers.) दरम्यान, प्रस्ताव पाठविण्याची मुदत शासनाने ३० जूनपर्यंत वाढविल्याने आता त्यांचा मदतीचा प्रस्ताव पाठविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. ३० मार्चपासून आतापर्यंत जवळपास ३० शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील दोन शिक्षक व एका लिपिकाचा मृत्यू झाला आहे. (Thirty teachers have been affected by the corona, including two teachers and a clerk.) आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सोलापूर महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी कादर शेख यांनी सांगितले आहे. 

७९ शिक्षकांचा नकार

शहरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्‍तीची माहिती घेत असताना प्रत्येक सदस्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जात असून त्यांची ऑक्‍सिजन लेव्हलही तपासली जात आहे. प्रत्येक शिक्षकास किमान ३० ते ३५ दिवसांची ड्यूटी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शिक्षकांना सर्व्हेचे काम करावे लागते. (Municipal Corporation orders 467 teachers to be present on duty.)महापालिकेने ४६७ शिक्षकांना ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश काढले.

मात्र, त्यापैकी ७९ शिक्षकांनी ड्यूटी रद्द करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात १७ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असून सहा शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित असल्याची कारणे देण्यात आली आहेत. (Teachers have demanded cancellation of duty citing other reasons including illness.) तर उर्वरित शिक्षकांनी आजारपणासह अन्य कारण देऊन ड्यूटी रद्दची मागणी केली आहे.

हे ही वाचा ः आमदार गायकवाडांचे महाराजांच्या जखमेवर मीठ, टिच्चून बिर्यांनी आणि अंडी वाटप..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख