'त्या' दिवशी शरद पवार काँग्रेसवर चिडले होते - संजय राऊतांचा गौप्यस्फोट

नेहरू सेंटरमधल्या २२नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले.असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे
Mallikarjun Kharge - Sharad Pawar.
Mallikarjun Kharge - Sharad Pawar.

पुणे : ''असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले," असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक 'सामना' मधील 'रोखठोक' सदरात केला आहे.

निवडणुकांचे निकाल ते शपथविधी हा ३७ दिवसांचा रोमांचक प्रवास होता. या सर्व दिवसांतील बहुतेक सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. महाराष्ट्राबरोबर यात दिल्लीच्याही घडामोडी आहेत. सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, सोनिया गांधी या प्रमुख पात्रांनी वठवलेल्या भूमिका महत्त्वाच्या. या सगळय़ात पंतप्रधान मोदी यांची भूमिका मूक चित्रपटातील नायकाची होती व भाजपचे सरकार यावे म्हणून श्री. अमित शहा दिग्दर्शकाच्या भूमिकेत होते, असे वर्णन राऊत यांनी केले आहे. 

याबाबत राऊत म्हणतात.....असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. १७ नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ‘‘तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?’’ तेव्हा ‘‘आमचा आकडा १७० आहे’’ असे मी सांगितले. त्या १७० आकडय़ाची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते.

....नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. . त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे श्री. पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला. यानंतर श्री. अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱया दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळय़ात झाले...अशीही माहिती राऊत यांनी दिली आहे.

नोव्हेंबरला पहाटे राजभवनात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी झाला. हा रोमांचक, थरारक, तितकाच रहस्यमय चित्रपट ‘गोल्डन ज्युबिली’ चालेल असे दुपारी बारा वाजेपर्यंत अनेकांना वाटत होते, पण पहिल्याच शोला हा चित्रपट कोसळला व त्यानंतर खेळ जास्तच रंगला. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार व अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता, असे वर्णन राऊत यांनी केले आहे. 

"फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, की तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.  मी त्याक्षणीही सांगितले, की चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.  हे यासाठीच सांगायचे की,  अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे नाट्य तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे,'' असेही राऊत यांनी 'रोखठोक' मध्ये नमूद केले आहे.
Edited By - Amit Golwalkar 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com