एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देणार;  एकनाथ शिंदेंनी घेतली लोणकर कुटुंबियांची भेट - Will do justice to MPSC students; Eknath Shinde visited Lonakar family | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देणार;  एकनाथ शिंदेंनी घेतली लोणकर कुटुंबियांची भेट

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

, श्री. शिंदे यांनी स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने दहा लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.

पुणे : महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली. ३१  जुलैअखेरपर्यंत १५ हजार ५०० पदांची भरती करण्याची घोषणा सरकारने केली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. Will do justice to MPSC students; Eknath Shinde visited Lonakar family

एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार तानाजी सावंत उपस्थित होते. 

हेही वाचा : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कार्यकर्त्याच्या भूमिकेत..

याप्रसंगी, श्री. शिंदे यांनी स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने दहा लाख रुपयांची मदत सुपुर्द केली. श्री. शिंदे म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, राज्य सरकार संवेदनशील आहे. स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गंभीर दखल घेऊन १५,५०० पदांची तातडीने भरती करण्याचा निर्णय घेतला. 

आवश्य वाचा : काँग्रेस देणार दोन मंत्र्यांना डच्चू; विधानसभा अध्यक्षांसह दलित आमदाराला मिळणार मंत्रिपद

गेल्याच आठवड्यात झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केला असून याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात देखील केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. याप्रसंगी, स्वप्नील लोणकरचे वडील सुनिल लोणकर, आई छाया लोणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, उपाध्यक्ष आकाश शिंदे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख