पिंपरी पालिका प्लाझ्मा दात्यांना देणार दोन हजार; गरजू रुग्णांना प्लाझ्मा मोफत पुरविणार

प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे असे असंख्य फोन आणि मेसेज येत आहे. त्यामुळे प्लाझ्माचा तुटवडा भरून काढण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
पिंपरी पालिका प्लाझ्मा दात्यांना देणार दोन हजार; गरजू रुग्णांना प्लाझ्मा मोफत पुरविणार
Pimpri Municipality to donate Rs 2,000 to plasma donors; Provide free plasma to needy patients

पिंपरी : दुर्बल घटकातील प्रत्येकाला तीन हजार रुपयांची मदत काल (ता.१५) जाहीर केल्यानंतर आज (ता. १६) पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येक प्लाझ्मा दात्याला दोन हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्लाझ्मा दानासाठी दाते पुढे येऊन गरजू रुग्णांचा जीव वाचेल, असा विश्वास पालिकेला वाटतो आहे. 

दुर्बल घटकातील व्यक्तीला अर्थसहाय्य करणारी पिंपरी पालिका राज्यातील जशी पहिली पालिका ठरली आहे, तशीच प्लाझ्मा दात्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा पहिला मानही तिनेच मिळवला आहे. या दातृत्वातून तिने आपल्यातील खरी श्रीमंती दाखवून दिली आहे. कालच्या निर्णयाबद्दल कष्टकरी नेत्यांनी पालिकेचे आभार मानले. तर, आजच्या या दुसऱ्या तशाच निर्णयामुळे आता कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडूनही तीच भावना व्यक्त होत आहे.

पिंपरी शहरात कोरोनाचा दुसऱ्या लाटेत उद्रेक झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारादरम्यान प्लाझ्माची मागणी वाढली आहे. कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे. अशा स्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी "प्लाझ्मा थेरपी' कडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. म्हणून पालिकेने प्लाझ्मा वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पालिकेने हा प्रोत्साहनपर उपक्रम सुरु केला आहे.

कारण संसर्गाच्या भीतीने रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा फटका प्लाझ्मा संकलनाही बसला आहे. शिवाय दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान मोहीम तशीही थंडावते. अशारितीने दुहेरी कात्रीत प्लाझ्मा अडकल्याने कोरोना रुग्णांची, मात्र प्लाझ्माअभावी सध्या ससेहोलपट सुरु आहे. कोरोनामुक्त व्यक्तीच प्लाझ्मादान करू शकतात. मात्र पुन्हा संसर्ग होईल या भीतीने ते ही पुढे येत नसल्याचे चित्र सतावते आहे.

शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आवाहन करूनही प्लाझ्मा देण्यासाठी फारसे लोक पुढे येत नसल्याने मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे असे असंख्य फोन आणि मेसेज येत आहे. त्यामुळे प्लाझ्माचा तुटवडा भरून काढण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in