खासदार श्रीरंग बारणेंचा राज्य सरकारला इशारा; भंडारा डोंगरातून रिंगरोड नेण्यास केला विरोध 

शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेटही येथेच झाली होती. म्हणून हा डोंगर फोडण्यास विरोध आहे.
खासदार श्रीरंग बारणेंचा राज्य सरकारला इशारा; भंडारा डोंगरातून रिंगरोड नेण्यास केला विरोध 
MP Shrirang Barne warns state government; Opposed to take the ring road from Bhandara hill

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला पुणे जिल्ह्यातील भंडारा डोंगराला (ता. मावळ) भेदून जाणा-या रिंगरोडला वारकऱ्यांचा विरोध असल्याने त्यात बदल करा. पोलिस बळाचा वापर करून हे काम केले, तर पिंपरी महापालिकेच्या बंद जलवाहिनी प्रकल्पासारखी त्याची गत होईल, असा इशारा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (ता.२४) आपल्याच राज्य सरकारला दिला. MP Shrirang Barne warns state government; Opposed to take the ring road from Bhandara hill

राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला 110 मीटर रुंद रिंगरोड भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात आहे. डोंगराला बोगदा करण्यास वारक-यांचा तीव्र विरोध आहे. म्हणून श्री विठ्ठल रुखमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टने रिंगरोडच्या मार्गात बदल करण्याची मागणी खा.बारणेंकडे केली होती.त्यावर खासदार बारणेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. 

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारही यावेळी उपस्थित होते. वारक-यांच्या भावना लक्षात घेऊन भंडारा डोंगराला भेदून जाणा-या रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची  मागणी यावेळी खासदार बारणेंनी केली. त्यावर वारक-यांची भावना न दुखावता मार्ग काढण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. यासंदर्भात खासदार बारणे म्हणाले,  श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अत्यंत पवित्र असे ठिकाण आहे. या डोंगरास राज्य सरकारने तीर्थक्षेत्र घोषित करून तेथे विकासकामे केली आहेत. 

ट्रस्टतर्फे श्री संत तुकाराम महाराजांचे जागतिक किर्तीचे भव्य मंदिर या डोंगरावर बांधण्यात येत आहे. शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेटही येथेच झाली होती. म्हणून हा डोंगर फोडण्यास विरोध आहे.  पिंपरी चिंचवडला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा होत आहे. त्यासाठी धरणातून पवना नदीत पाणी सोडले जाते. त्यात पाणी वाया जात असल्याने ते जलवाहिनीतून आणण्याची योजना आखण्यात आली होती. त्याला मावळातील शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यासाठी भारतीय किसान मोर्चा, शिवसेना आणि भाजपने आठ ऑगस्ट २०११ रोजी मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी मरण पावले, तर १६ जखमी झाले होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in