खेड तालुक्यात कोरोनाच्या संसर्गासोबतच लग्नसोहळ्यातील गर्दीही वाढली... 

गावांगावांत लग्नाच्या वरातीही डिजे लावून, नाच गोंधळ करून केल्या जात आहेत. याकडे पोलिसांचे लक्ष नाही, असा आरोपही नागरिकांचा आहे. लग्न सोहळे सध्या मंगल कार्यालयात होत आहेत. त्यावेळी दिड, दोन हजार लोकांची गर्दी होत आहे. लग्न सोहळ्यात नेत्यांची भाषणे सत्कार आदी कार्यक्रम जोरात सुरू आहेत.
खेड तालुक्यात कोरोनाच्या संसर्गासोबतच लग्नसोहळ्यातील गर्दीही वाढली... 
In Khed taluka, along with the infection of corona, the crowd at the wedding ceremony also increased ...

चाकण : राज्यात कोरोना रूग्ण वाढीचा वेग सध्या वाढत असताना खेड तालुक्यात लग्न समारंभासाठी अगदी दीड, दोन हजारावर लोकांची उपस्थिती कोरोनाचे नियम बाजूला सारून मास्क ही न लावता होत आहे हे वास्तव धक्कादायक आहे. नेत्यांची भाषणे लग्नसोहळ्यात सर्रास होत आहेत. त्यामुळे नेत्यांनो आता लग्न तरी आवरा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पण लग्नसोहळ्यातील गर्दी काही कमी होत नाही. याकडे पोलिस यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.

खेड तालुक्यात लग्न सोहळे हॉटेल, मंगल कार्यालये यामध्ये पूर्वीसारखे धुमधडाक्यात सुरू आहेत. एका लग्नासाठी गर्दी तर दीड, दोन हजार लोकांची होत आहे. त्यात कोरोनाचे नियम न पाळता ही गर्दी होत आहे. कोणी मास्कही लावत नाही. जेवणावळी ही नियम न पाळता केल्या जात आहेत. त्यामुळे खेड तालुक्यात रूग्ण वेगाने वाढत आहेत. हे ही धक्कादायक आहे. पण याकडे कोणी लक्ष देत नाही. 

गावांगावांत लग्नाच्या वरातीही डिजे लावून, नाच गोंधळ करून केल्या जात आहेत. याकडे पोलिसांचे लक्ष नाही, असा आरोपही नागरिकांचा आहे. लग्न सोहळे सध्या मंगल कार्यालयात होत आहेत. त्यावेळी दिड, दोन हजार लोकांची गर्दी होत आहे. लग्न सोहळ्यात नेत्यांची भाषणे सत्कार आदी कार्यक्रम जोरात सुरू आहेत. 

सरकारी नियम आदेश यांचे उल्लंघन खुलेआम होत आहे. कोणी तक्रारी पोलिसांकडे केल्या तरी कारवाई होत नाही हे चित्र आहे. काही पोलिस मात्र आयोजकांकडून काही रक्कम घेऊन "तेरीभीचुप मेरीभी चुप" असे धोरण स्विकारत आहेत

त्यामुळे पोलिस कारवाई होत नाही. त्यामुळे लग्न सोहळे गर्दीच्या थाटात साजरे होत आहेत. काही लग्नसोहळे झाल्यानंतर वधू, वरांच्या घरातील काही मंडळी आजारी पडत आहेत हे वास्तव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत आहेत हे धक्कादायक आहे, पण याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही.
 
Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in