आमदार शेळकेंची साद आणि त्याला भेगडेंचा प्रतिसाद

कोरोना काळात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना अनेक शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक फीसाठी पालकांकडे तगादा लावला असल्याने कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही बैठक घेण्याची मागणी आजी आमदारांनी माजी आमदारांकडे केली होती.
I will hold a fee waiver meeting, you get government help Former MLA of Maval Bala Bhegade retaliates against MLA Sunil Shelke
I will hold a fee waiver meeting, you get government help Former MLA of Maval Bala Bhegade retaliates against MLA Sunil Shelke

पिंपरी : कोरोना संकटात मावळ तालुक्यातील Maval (जि.पुणे) पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत मिळवून देण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीकरिता पुढाकार घेण्याची राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनील शेळके MLA Sunil Shelke यांची विनंतीवजा मागणी माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे Bala Bhegade यांनी मान्य करीत तहसीलदारांना ही बैठक घेण्यासाठी पत्र दिले. एवढेच नाही, तर कोरोना महामारीचा मोठा फटका बसलेल्या घटकाला आपल्या सरकारकडून आर्थिक मदतीची मोठी अपेक्षा असून ती मिळवून देण्यासाठी तालुक्याचे आमदार म्हणून आपण पुढाकार घ्यावा, असा पलटवार यानिमित्ताने शेळकेंवर करण्यास भेगडे विसरले नाहीत. I will hold a fee waiver meeting, you get government help Former MLA of Maval Bala Bhegade retaliates against MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील अनेक शिक्षण संस्थांचे अध्यक्ष असल्याने भेगडे यांच्याकडे शेळके यांनी वरील मागणी १४ जूनला पत्राव्दारे करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती त्यांनी होऊ दिली, तर नाहीच. उलट शेळकेंचा डाव त्यांच्यावरच शिताफीने उलटवला. भेगडे यांनी शेळकेंच्या एका पत्राचे उत्तर काल शुक्रवारी १८ जूनला दोन पत्रांनी दिले. एक त्यांनी ते शेळकेंना, तर दुसरे मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना पाठवले. शेळकेंच्या पत्राव्दारे त्यांची कोंडी करण्याचा डाव भेगडेंनी खेळला. तर तहसीलदारांना शिक्षण संस्थाचालकांची बैठक बोलावण्यास सांगून त्यांनी शेळकेंच्या कोंडीतून स्वताची सुटका करून घेतली. 

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या बैठकीसाठी जसा पुढाकार घेतला, तसा तो २०२१-२२ साठीही घेण्यास भेगडेंनी तहसीलदारांना सांगितले आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना अनेक शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक फीसाठी पालकांकडे तगादा लावला असल्याने कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ही बैठक घेण्याची मागणी आजी आमदारांनी माजी आमदारांकडे केली होती. त्याला उत्तर देताना भेगडेंनी यासाठी पुढाकार घेण्याचे मान्य, तर केलेच. शिवाय योग्य ती पाऊले सर्वांना बरोबर घेऊन उचलू असेही सांगितले.

हे सांगताना राजकारणापलिकडे जाऊन या प्रश्नाकडे बघण्य़ाची गरज असल्याचा टोलाही लगावला.तसेच विद्यार्थी व संस्थांचा विचार करताना टोलवाटोलवी  न करता दोन्ही बाजूंने गांभीर्याने विचार सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे म्हणत या समस्येचा चेंडू एकप्रकारे पुन्हा शेळकेंकडे टोलवला.तसेच फी सूट देण्याबाबत संस्थाचालकांच्या बैठकीत निर्णय घेऊ, पण कोरोनामुळे मोठा फटका बसलेल्या समाज घटकाला आपल्या सबंधाचा वापर करून त्यांना आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांनाही सरकारकडून अपेक्षित असलेली आर्थिक मदत मिळवून द्याल, अशी अपेक्षा आहे. असे सांगत शेळकेंचा डाव त्यांच्यावरच भेगडेंनी उलटवण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com