जंबो कोविडमध्ये रुग्णांना मोबाईल नेण्याची अनुमती द्या : पिंपरीच्या उपमहापौरांची आयुक्तांना सूचना

जम्बोतच मोबाईल नेण्यास परवानगी का, नाही. जम्बो सेंटरचा संपूर्ण खर्च पालिका करते. त्यामुळे कोणाची मनमानी खपवून घेवू नये, असे त्यांनी आय़ुक्तांना बजावले. मोबाईल फोन नसल्याने रुग्णाचा नातेवाईकांशी कसलाही संपर्क होत नाही. नातेवाईकांनाही रुग्णाच्या प्रकृतीची माहिती मिळत नाही. कोरोना आजारापेक्षा माणसिक खच्चीकरणाने लोकांचा मृत्यू होत आहे.
जंबो कोविडमध्ये रुग्णांना मोबाईल नेण्याची अनुमती द्या : पिंपरीच्या उपमहापौरांची आयुक्तांना सूचना
Allow patients to carry mobile phones in Jumbo Covid: Pimpri Deputy Mayor instructs Commissioner

पिंपरी : कोरोना रुग्णाला मानसिक आधाराची गरज असते. कुटुंबियांशी बोलल्याने त्याला धीर मिळतो. परंतु, जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना मोबाईल फोन नेऊ दिला जात नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. मोबाईलअभावी कुटुंबाशी रुग्णाचा कसलाही संपर्क होत नाही. त्यामुळे तो खचून जातो. त्यासाठी रुग्णाला मोबाईल सोबत नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी केली आहे.

पालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन उपमहापौरांनी वरील  सूचना केली. मोबाईलअभावी रुग्णांना येणा-या अडचणींची त्यांनी प्रशासनाला जाणीव करुन दिली. त्या म्हणाल्या, कोरोनाची लागण झाल्याने रुग्ण खचून जातात. भीतीने घाबरतात. संपूर्ण कुटुंब चिंतेत, तणावात असते.त्यामुळे रुग्ण आणि कुंटुंबियांचा संपर्क होणे गरजेचे आहे.

बाधिताला मानसिक आदाराची आवश्यकता असते. कुटुंबियांशी, नातेवाईकांशी संवाद साधल्यावर जगण्याची उमेद मिळते. रुग्ण तणावमुक्त होतो.मात्र, महापालिकेच्या नेहरुनगर जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णाला आतमध्ये मोबाईल फोन नेवू दिला जात नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. इतर रुग्णालयात कोरोना रुग्णांना मोबाईल फोन सोबत बाळगू दिला जातो.

पण, जम्बोतच मोबाईल नेण्यास  परवानगी का, नाही. जम्बो सेंटरचा संपूर्ण खर्च पालिका करते. त्यामुळे कोणाची मनमानी खपवून घेवू नये, असे त्यांनी आय़ुक्तांना बजावले. मोबाईल फोन नसल्याने रुग्णाचा नातेवाईकांशी कसलाही संपर्क होत नाही. नातेवाईकांनाही रुग्णाच्या प्रकृतीची माहिती मिळत नाही. कोरोना आजारापेक्षा माणसिक खच्चीकरणाने लोकांचा मृत्यू होत आहे.

कोरोनारुग्णांना मानसिक आधाराची मोठी आवश्यकता असते. कुटुंबिय, नातेवाईकांशी, मित्रांशी बोलल्यानंतर रुग्णाला धीर मिळतो. जगण्याची प्रेरणा मिळते. कुटुंबाला रुग्णांच्या प्रकृतीची माहिती मिळते. त्यामुळे कुटुंब देखील रिलॅक्स राहते. त्यासाठी जम्बो सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना मोबाईल आतमध्ये नेण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना उपमहापौर घुले यांनी आयुक्तांना केली आहे.


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in