पिंपरीत पहिला कोरोनाचा डोस अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांना

लसीचे फक्त १५ हजार डोस मिळाले असून त्यासाठी १८ हजार जणांनी नोंदणी केली आहे. प्रत्येकाला दोनदा ही लस टोचली जाणार असल्याने फक्त साडेसात हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनाच मिळणार आहे. नोंदणी केलेल्या बाकीच्या साडेदहा हजारजणांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पिंपरीत पहिला कोरोनाचा डोस अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांना
Additional health officer vaccinated and started corona vaccination in Pimpri

पिंपरी : उद्योगनगरीतील कोरोना लसीकरणाची सुरवात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी स्वत लस टोचून केली. हा क्षण पालिका आयुक्त डॉ. श्रावण हर्डीकर यांनी सेल्फी घेत टिपला. दरम्यान, ही लस घेतल्यानंतर कसलाही त्रास जाणवला नसल्याचे डॉ. साळवे यांनी सरकारनामाला सांगितले. त्यामुळे लस घेतल्यानंतर ते लगचेच इतर ठिकाणच्या लसीकरण केंद्रांच्या पाहणीसाठी बाहेर पडले. 

महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर केशव घोळवे, पालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, स्थानिक नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमणी आदींच्या उपस्थितीत पालिकेच्या जिजामाता रुग्णालयात शहरातील कोविड लसीकरणाला सकाळी सुरवात झाली. 

शहरात आठ खासगी आणि पालिका रुग्णालयात ही लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे प्रत्येक दिवशी शंभरजणांना ही लस टोचण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेला या लसीचे फक्त १५ हजार डोस मिळाले असून त्यासाठी १८ हजार जणांनी नोंदणी केली आहे. प्रत्येकाला दोनदा ही लस टोचली जाणार असल्याने फक्त साडेसात हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनाच मिळणार आहे. नोंदणी केलेल्या बाकीच्या साडेदहा हजारजणांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in