गुन्ह्यांना सामोरे जाण्याची आमची तयारी; तुकाराम बीज यावर्षी होणारच - Tukaram Beej program to be held this year Says Bandatatya karadkar | Politics Marathi News - Sarkarnama

गुन्ह्यांना सामोरे जाण्याची आमची तयारी; तुकाराम बीज यावर्षी होणारच

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

सगळी थिएटर, ढाबे, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत. मग वारकरी सांप्रदायातील यात्रा, उत्सव व वारीला प्रतिबंध करून ते बंद पाडण्याचा उद्योग प्रशासनातील काही मंडळींकडून सुरू आहे.

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मंदिरे, यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम सरकारने बंद केले होते. यावर्षी देखील हीच परिस्थिती असून वारकऱ्यांनी कोणतीच यात्रा करु नये, असा याचा अर्थ होतो. मात्र, येत्या ३० मार्चला होणारी देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, असा इशारा बंडातात्या कराडकर यांनी
राज्य सरकारला दिला आहे.

यावर्षी देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणार आहे. यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे भासविले जात आहे.

पुणे जिल्ह्याची लोकसंख्या काही लाखांत असताना तिथे तीन साडेतीन हजार रुग्ण आढळून आले, म्हणजे सर्वांना कोरोना झाला आहे असे होत नाही. देहू आणि आळंदी येथे तर कोरोनाचे रुग्णच नाहीत. सगळी थिएटर, ढाबे, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत. मग वारकरी सांप्रदायातील यात्रा, उत्सव व वारीला प्रतिबंध करून ते बंद पाडण्याचा उद्योग प्रशासनातील काही मंडळींकडून सुरू आहे.

आषाढी, माघी, चैत्र वारी या सर्वांवर निर्बंध आणले गेले आहेत. यावर्षी कोरोनाची हीच परिस्थिती असून वारकऱ्यांनी कोणतीच यात्रा करु नये, असा याचा अर्थ होतो. मात्र, येत्या ३० मार्चला होणारी देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख