मराठा आरक्षणावर शरद पवारांनी भुमिका स्पष्ट करावी : सुरेशदादा पाटील  - Sharad Pawar should clarify role on Maratha reservation Says Maratha Leader Sureshdada Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल
बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे ही निवडणुक प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी भुमिका स्पष्ट करावी : सुरेशदादा पाटील 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

समाजातील मुलांचे ऍडमिशन थांबलेली आहेत. राज्य सरकार काय निर्णय घेणार हे समजत नाही. मराठा समाजातील ही पिढी बरबाद होतील काय असा प्रश्‍न आमच्या पुढे उभा आहे. त्यामुळे शरद पवार यांनी हा प्रश्‍न सोडवावा. आम्हाला पुन्हा आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर यायला लावू नये.'' 

सातारा : मराठा आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसह ओबीसी समाजानेही पाठींबा दिला आहे. पण, मराठा समाजाच्या नेत्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या प्रश्‍नाकडे दूर्लक्ष करतात काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांनी आरक्षण मुद्यावर आपली भुमिका स्पष्ट करावी. दोन सप्टेंबरला साताऱ्यात होणाऱ्या गोलमेज परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेशदादा पाटील यांनीआज दिली. 

साताऱ्यातील कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षण समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, "राज्य सरकारमध्ये तिघांची आघाडी असून या महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आम्ही विनंती करणार आहोत. वंचित आघाडीचे नेते तसेच ओबीसी समाजानेही आम्हाला पाठींबा दिला आहे. पण, मराठा समाजाचा जाणता राजा शरद पवार आरक्षणावर काहीही बोलत नाहीत. त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. दोन्ही राजे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीशीच आहेत.

 कालच्या सुनावणी वेळी त्यांचे वकिलच वेळेवर पोहोचलेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्‍न सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत असून राज्य सरकार मराठा समाजाला गृहित धरत असल्याचे दिसते. मराठा समाजातील नेत्यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही याकडे दुर्लक्ष करता का काय अशी भावना समाजात निर्माण झाली आहे, असे नमूद करुन ते म्हणाले,""102 व्या घटना दुरूस्तीत कोणत्याही राज्य सरकारला त्यावर निर्णय घेण्याची परवानगी नाही.

केवळ मागासवर्गीय आयोगानेच निर्णय घ्यायचा आहे. 103 वी घटना दुरूस्तीत आर्थिक मागास असलेल्यांनाच आरक्षण दिले आहे. हा प्रश्‍न राज्य सरकार व मराठा नेत्यांचा आहे. या समाजातील मुलांचे ऍडमिशन थांबलेली आहेत. राज्य सरकार काय निर्णय घेणार हे समजत नाही. मराठा समाजातील ही पिढी बरबाद होतील काय असा प्रश्‍न आमच्या पुढे उभा आहे.
त्यामुळे शरद पवार यांनी हा प्रश्‍न सोडवावा. आम्हाला पुन्हा आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर यायला लावू नये.'' 

उदयनराजेंनी नेतृत्व करावे....

उदयनराजेंनी मराठा आरक्षण प्रश्‍नाचे नेतृत्व करावे. त्यांनी स्वत:हून आपण नेतृत्व करतो, असे म्हटले तरी आम्हाला अडचण नाही. त्यांना आम्ही गोलमेज परिषदेचे निमंत्रण देणारच आहोत, असेही  सुरेशदादा पाटील यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख