पुणे शिक्षक मतदारसंघ; दत्तात्रय सावंत, रेखा पाटील यांच्यात सामना रंगणार

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विस्ताराने मोठा असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य नसते.त्यामुळे अनेक उमेदवार शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण संस्थांचालक यांचे माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचारासाठी छंदिष्ट शिक्षक कार्यकर्ते प्रत्येक शाळेपर्यंत पोचत असत. यंदा कोरोनामुळे शाळा बंद असून अत्यावश्यक काम असेल तरच शिक्षक शाळेत येत आहेत. परिणामी शिक्षकांशी थेट संपर्क साधने, गाठी भेटी घेणे अशक्य होत आहे.
Rekha Patil And Datta sawant
Rekha Patil And Datta sawant

मायणी (ता. खटाव) : शिक्षक आमदारकीसाठी पुणे मतदारसंघातून इच्छुकांची भाऊगर्दीत असून यावर्षी प्रथमच डीएड शिक्षक संघटनेने सवता सुभा मांडत शड्डू ठोकला आहे. सध्या या मतदारसंघातून विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षिका सौ. रेखा पाटील याही इच्छुक आहेत.

यासोबतच शिक्षक परिषदेकडून माजी आमदार भगवानराव साळुंखे, जितेंद्र पवार तर टीडीएफ संघटनेच्या माध्यमातून जे. के. थोरात, डीएड पदवीधर,कला, क्रीडा, शिक्षक-शिक्षकेतर महासंघामार्फत महादेव माने, तसेच डीएड शिक्षक संघटनेकडून नंदकिशोर गायकवाड, राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशनचे बाळासाहेब गोतारणे रिंगणात असणार आहेत. पण खरी लढत विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत व रेखा पाटील यांच्यातच रंगण्याची चिन्हे आहेत. 

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाल जुलैअखेर संपुष्टात आला. कोरोनामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची अधिसूचनाही लांबणीवर पडली. मात्र आज आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून येत्या एक डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विस्ताराने मोठा असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य नसते.त्यामुळे अनेक उमेदवार शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण संस्थांचालक यांचे माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचारासाठी छंदिष्ट शिक्षक कार्यकर्ते प्रत्येक शाळेपर्यंत पोचत असत. यंदा कोरोनामुळे शाळा बंद असून अत्यावश्यक काम असेल तरच शिक्षक शाळेत येत आहेत. परिणामी शिक्षकांशी थेट संपर्क साधने, गाठी भेटी घेणे अशक्य होत आहे.

म्हणूनच व्हाट्सअप, फेसबुक, टेक्स्ट मेसेज, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमांद्वारे मतदारांशी संपर्क साधण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांनी मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध घटकांना तालुका स्तरावर आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शिक्षक आमदारकीची निवडणूकचर्चेत येऊ लागली आहे.

दरम्यान, 2014 च्या निवडणूकीत तत्कालीन आमदार भगवानराव साळुंखे, दत्तात्रय सावंत, डॉ. मोहन राजमाने, दशरथ सगरे, सुभाष माने यांच्यात चुरस निर्माण झाली होती. त्यामध्ये दत्तात्रय सावंत विजयी झाले होते. गेल्या सहा वर्षात बरेच पाणी पुलाखालून गेले. माध्यमिक शाळांतील डीएड पदवीधर शिक्षकांवर सेवा जेष्ठतेमध्ये चाळीस वर्षांपासून अन्याय झाल्याची खदखद वाढली आहे. परिणामी, यंदा प्रथमच शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत डीएड शिक्षक  संघटनांनी उडी घेतली आहे.

संघटनेतील डीएड, कला व क्रीडाशिक्षकांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ठराविक संघटना व शिक्षक नेत्यांची मक्तेदारी मोडीत  निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, विजयासाठी राजकीय पक्षांची मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विनाअनुदानीत शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न,  जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, नवीन शैक्षणिक धोरण, आदी प्रश्न आजही 'आ' वासून उभे आहेत.

सध्या शिक्षक परिषदेकडून माजी आमदार भगवानराव साळुंखे व जितेंद्र पवार इच्छुक आहेत. सलग दोनदा संधी देऊनही पराभूत झालेल्या डॉ. मोहन राजमानेंची तयारी दिसत नसल्याने माजी प्राचार्य बुरुंगले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेतील शिक्षिका रेखा दिनकर पाटील यांनी पदर खोचला आहे. टीडीएफ संघटनेच्या माध्यमातून जे.के.थोरात नशीब अजमावणार आहेत. डीएड पदवीधर,कला, क्रीडा, शिक्षक-शिक्षकेतर महासंघामार्फत महादेव माने, महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघातून नंदकिशोर गायकवाड, तसेच राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशनचे बाळासाहेब गोतारणे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. 
निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. 

 नव्या चेहऱ्याची परंपरा
पुणे मतदारसंघात मुकुंदराव कुलकर्णी, सुरेश पाटील यांचा अपवाद वगळता शिक्षक मतदारांनी प्रत्येकवेळी नवीन आमदार निवडून दिल्याची परंपरा आहे. सन 2002 मध्ये गजेंद्र ऐनापुरे, 2008 मध्ये भगवानराव साळुंखे, 2014 मध्ये दत्तात्रय सावंत यांनी विजय मिळवला. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार नव्या चेहऱ्याला पसंती देणार की विद्यमान आमदार सावंत परंपरा मोडीत काढणार हे येणारा काळच ठरवेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com