१५ दिवसांत परिणाम दिसण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना

कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल. पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरु केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या होत आहेत. पण सावधानता बाळगावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा संसर्ग वाढत आहे, ही चिंतेची बाब असून साथीचा फोकस सातारा, सांगली व कोल्हापूरकडे सरकणे हे निश्चितच जबाबदारी वाढविणारे आहे. कोरोन लढ्यासाठी राज्य शासन संपूर्णपणे सहकार्य करणार आहे.  सुविधा कितीही उभ्या केल्या तरी काही प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यामध्ये एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहिम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या. तरच येत्या १५ दिवसात चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी या सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक सहभागी झाले होते. 

सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई- ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा.. अशी मराठीत म्हण आहे. कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी काही जिल्ह्यांकडून झाल्या त्या पुन्हा होऊ देऊ नका. इतर देश केवळ कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपले तसे नाही.

आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम हे सण झाले. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाळाही सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे असून हाच कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी काही प्रमुख मुद्य्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यामध्ये एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहिम अधिक गांभीर्यपूर्वक राबविणे, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या. हे सर्व पाळले तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील. 

 कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात
सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोन लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार आहे.

मात्र कोणतीही कुचराई करू नका आणि गाफील राहू नका, असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल. पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम
पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपण अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरु केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या होत आहेत. पण सावधानता बाळगावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कुटुंब चौकशी मोहिम राबविणार....
आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय मदतीने  संपूर्ण राज्यात घरोघर भेटी देऊन कुटुंबांच्या आरोग्याची चौकशी मोहिम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल. यामध्ये घरातल्या कुणाला इतरही काही आजार आहेत का, त्यांचे आरोग्य कसे आहे, त्यांना न्युमोनियासदृश्य काही लक्षणे आहेत का, घरात बाहेरून कुणी व्यक्ती आल्या आहेत काय, मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का, याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com