रयत क्रांती संघटनेतर्फे स्मशानभूमी मध्येच राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन..! 

रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यभर अशा प्रकारची आंदोलने आज करण्यात आली आहेत. शासन फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त आहे व भ्रष्टाचार करण्यातच दंग आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोना रुग्णालयातील सर्व प्रश्न तसेच लॉकडाउन केल्यामुळे ज्यांची हातावर पोट आहे त्यांना कोणतीही मदत नाही. या सर्व गोंधळातील कारभारामुळे जनता भयभीत झाली असून जनतेला राज्यात कोणीच वाली राहिलेला नाही.
Burning of state government statue in the cemetery by Rayat Kranti Sanghatana
Burning of state government statue in the cemetery by Rayat Kranti Sanghatana

पुणे : आज कानगाव येथील स्मशानभूमीमध्ये कोरोना सहित सर्व विषयावरती अपयशी ठरलेल्या राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन रयत क्रांती संघटनेतर्फे करण्यात आले. हे राज्यव्यापी महाविकास आघाडीचे पुतळण्याचे आंदोलन आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे, सामाजिक कार्यकर्ते तात्यासो मोरे, नामदेव फडके आदी उपस्थित होते. 

वास्तविक पाहता कोरोनामुळे राज्यातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. रेमडेसिवर इंजेक्शन नाही, बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, तसेच स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी सुद्धा नंबर लावावे लागतात. इतकी दयनीय अवस्था आज राज्यातील जनतेवर या नाकर्ते सरकारमुळे आलेली आहे. याचा निषेध म्हणून रयत क्रांती संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यभर अशा प्रकारची आंदोलने आज करण्यात आली आहेत. शासन फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त आहे व भ्रष्टाचार करण्यातच दंग आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोना रुग्णालयातील सर्व प्रश्न तसेच लॉकडाउन केल्यामुळे ज्यांची हातावर पोट आहे त्यांना कोणतीही मदत नाही. या सर्व गोंधळातील कारभारामुळे जनता भयभीत झाली असून जनतेला राज्यात कोणीच वाली राहिलेला नाही. 

कोरोना रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. तसेच वर्षभरापासून कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे सर्वांचेच कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. या गंभीर बाबींकडे सुद्धा राज्य शासनाचे लक्ष नाही. या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे स्मशानभूमीत राज्यशासनाच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले. 
- भानुदास शिंदे (राज्य प्रवक्ता, रयत क्रांती संघटना)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com