भोरचे सभापती राजीनामा देणार? राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत चर्चेला उधाण...

पक्षाच्या विरोधात जाणारया सदस्यांवर कारवाई होणे व पक्षशिस्त पाळणाऱ्या कार्यकर्त्यास सन्मान देणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षीय पातळीवरील वरिष्ठांकडुन राजीनाम्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भोरचे सभापती राजीनामा देणार? राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत चर्चेला उधाण...
Bhor Speaker to resign? Discussions abound among NCP workers ...

नसरापूर : सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा व्हीप डावलुन बंडखोरी करत सभापती पदी विराजमान झालेल्या भोरच्या सभापती दमयंती जाधव यांनी निवडीनंतर सहा महिन्यानंतर राजीनामा देणार अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार सभापती आता राजीनामा देणार काय, याबाबत भोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह राजकीय आघाडीवर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. Bhor Speaker to resign? Discussions abound among NCP workers ...

भोरचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी ठरल्याप्रमाणे 30 जानेवारी 2021 मध्ये राजीनामा दिल्यानंतर पंचायत समितीमध्ये सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरल्यानुसार लहुनाना शेलार यांना सभापती करण्यासाठी राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांना जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी व्हीप काढला होता. मात्र हा व्हीप डावलत सदस्य दमयंती जाधव यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल करुन काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य यांचे मतदान घेत सभापती पद मिळवले होत.

त्यानंतर राष्ट्रवादी श्रेष्ठींचा आदेश डावलल्या प्रकरणी लहुनाना शेलार यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. या दरम्यान, सभापती दमयंती जाधव यांनी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचाच असुन पक्षाच्या विरोधात आम्ही जाणार नाही, सन्मानाने सहा महिन्याने सभापतीपदाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका स्पष्ट केली होती. 18 फेब्रुवारी 2021 रोजी सभापती पदाची निवडणूक होऊन जाधव सभापती झाल्या होत्या. 18 आँगस्ट 2021 रोजी सहा महिने पूर्ण झाल्याने राजकीय कार्यकर्त्यांची सभापतींच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे. 

सभापती मॅडम यांनी म्हंटल्याप्रमाणे राजीनामा देणार काय? याबाबत चर्चा करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटतट बाजुला पडुन एकसंघता वाढली पाहिजे, तरच पुढील निवडणुकीत यश मिळणार आहे. यासाठी पक्षाच्या विरोधात जाणारया सदस्यांवर कारवाई होणे व पक्षशिस्त पाळणाऱ्या कार्यकर्त्यास सन्मान देणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षीय पातळीवरील वरिष्ठांकडुन राजीनाम्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in