राजीव सातव यांची प्रकृती नाजूक; सायटोमॅगीलो व्हायरसची लागण - health of Rajiv Satav is serious says health minister Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

राजीव सातव यांची प्रकृती नाजूक; सायटोमॅगीलो व्हायरसची लागण

लक्ष्मण सोळुंके
शनिवार, 15 मे 2021

राजेश टोपे पुण्यात येऊन भेट घेणार

जालना : कॉंंग्रेसचे सरचिटणीस (General Secreataty of Congress) नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) हे कोरोनामुक्त झाले असली तरी त्यांना इन्फेक्शन झाले असल्याने त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे बोलताना दिली.

पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप ते व्हेटिंलिटरवर आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर ते व्हेंटिलिटरशिवाय श्वास घेत होते. मात्र त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मी त्यांची दवाखान्यात जाऊन भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे आणि मुंबई येथील डाॅक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. मराठवाड्याच्या या सुपूत्राला लवकरात लवकर आराम पडो, यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे टोेपे म्हणाले. 

Good News : परिस्थिती सुधारतेय; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट....
 

19 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. 22 तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 23 एप्रिलला ते पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. 25 तारखेला त्यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तर काही तक्रारींमुळे 28 तारखेला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सातव यांच्यावरील उपचारासाठी मदत केली होती.

हे ही वाचा : फडणवीसांनी मराठा समाजाची फसवणूक केली...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करत सातव यांच्या प्रकृतीसंबंधी विचारपूस केली होती. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जहांगीर रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख