शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील २९ लाख दिव्यांगाना मिळणार अनोखी भेट..

गरजू दिव्यांग नागरिक व त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्या विविध सामाजिक घटकांना एकत्र करून मदत मिळवून देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याचे सर्व स्तरातून स्वागत होत असल्याचेही मुंडे म्हणाले.१२ डिसेंबर पासून गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छुक दात्यांना या पोर्टल वर नोंदणी करता येणार असून, कोणत्या प्रकारची मदत, सहाय्यक उपकरण किंवा अन्य सहाय्य आवश्यक आहे .
minister dhnanjay munde news mumbai
minister dhnanjay munde news mumbai

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील २९ लाखा पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.दिव्यांग कल्याण आयुक्तालयमार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे, 'महाशरद' अॅपचे लोकार्कपण उद्या १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त महाविकास आघाडी सरकारच्या वतीने विविध लोकोपयोगी योजना सुरू करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम आणि योजनांचा समावेश आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे ई-बार्टी हे मोबाईल अँप तयार करण्यात आले असून, त्याचे लोकार्पण देखील उद्या होणार आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या लाईव्ह सोहळ्यामध्ये  या पोर्टलचे व ई-बार्टीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे सर्व मंत्री  व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धनंजय मुंडे म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना विविध आधुनिक उपकरणे वापरून सामान्य व्यक्तिप्रमाणे जीवन व्यथित करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हील चेअर असे दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक  सहाय्यक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही. समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खाजगी कंपन्या, उद्योजक असे अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक असतात, या गरजू दिव्यांग व्यक्तींची व दात्यांची सांगड घालून देण्याचे काम महाशरद या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

महाशरद प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ उद्या (दि.१२) रोजी सुरू होत असून मार्च -२०२१ अखेरपर्यंत मोबाईल ऍप्लिकेशन स्वरूपात देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल. महाशरद चा 'महाराष्ट्र सिस्टीम ऑफ हेल्थ रिहॅबिलिटेशन अँड असिस्टंस फॉर दिव्यांग' असा विस्तार असून शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याचे लोकार्पण होणार आहे. या माध्यमातून २९ लाख दिव्यांग व्यक्तींपर्यंत मदत पोचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही मुंडे यांनी नमूद केले.

राज्यातील पहिलाच प्रयोग...

महाशरद हे डिजिटल प्लॅटफॉर्म पोर्टल उद्यापासून सुरू होत असून ते अँड्रॉइड ऍप्लिकेशन च्या स्वरूपात प्ले-स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विभागातील अधिकारी, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग वित्त महामंडळ यातील अधिकारी/कर्मचारी यांनी अत्यंत कमी वेळेत 'महाशरद' प्लॅटफॉर्म साकारला असून, याचे मोबाईल ऍप्लिकेशन मार्च २०२१ पर्यंत प्ले-स्टोअर वर उपलब्ध होईल, असे सांगतानाच त्यांनी यासाठी कष्ट घेणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक केले.

गरजू दिव्यांग नागरिक व त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्या विविध सामाजिक घटकांना एकत्र करून मदत मिळवून देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याचे सर्व स्तरातून स्वागत होत असल्याचेही मुंडे म्हणाले. १२ डिसेंबर पासून गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छुक दात्यांना या पोर्टल वर नोंदणी करता येणार असून, कोणत्या प्रकारची मदत, सहाय्यक उपकरण किंवा अन्य सहाय्य आवश्यक आहे याबाबत दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार यावर सविस्तर वर्गीकरण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे मोबाईल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अँप मध्ये एम - गव्हर्नन्स सहित, बार्टीतील सर्व योजना, इ- लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती योजना आदी सर्व योजना एका क्लिक वर मोबाईल वरून हाताळता येणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, तक्रार निवारण, अभिप्राय आदी सुविधांसह विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे ऍप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव शाम तागडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक धम्मदीप गजभिये आदी उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com