शिवसेनेच्या युवासेनेला आता भिडणार भाजपचे युवा वॉरिअर्स...

दोन्ही पक्षआता जानी दुश्मन झाल्याने त्यांनी एकमेकांविरुद्ध लढण्यासाठीही युवा सेना उभी केली जात आहे.
शिवसेनेच्या युवासेनेला आता भिडणार भाजपचे युवा वॉरिअर्स...
Anup more.jpg

पिंपरीः आपल्या देशाच्या लोकसंख्येत तरुण जास्त आहेत. तसा देशाच्या मतदानातही युवावर्गाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपने (BJP) २५ वर्षापर्यंतच्या युवकांना) आपल्या रडारवर घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यानंतरच्या विधानसभा व लोकसभा (Loksabha Election) निवडणुकीसाठी त्यांनी प्रत्येक वॉर्डात युवा वॉरिअर्सची एक शाखा उघडण्याचा निश्चय केला आहे. तर, आगामी तीन महिन्यात २५ लाख युवा वॉरिअर्सची फौज राज्यात ते उभी करणार आहेत.

दरम्यान, सहा महिन्यांवर आलेल्या राज्यातील दहा महापालिकांसह जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या रणधमुाळीत शिवसेनेच्या युवासेनेविरुद्ध भाजपच्या या युवा वॉरिअर्सची धुमश्चक्री उडणार आहे. युवा सैनिकांना टक्कर देण्याच्या हेतूनेच हे वॉरिअर्स भाजपने तयार केले आहेत. २५ वर्षे जीवलग मित्र असलेले भाजप आणि शिवसेना
हे  दोन्ही पक्ष आता जानी दुश्मन झाल्याने त्यांनी एकमेकांविरुद्ध लढण्यासाठीही युवा सेना उभी केली जात आहे. पण, राजकारणात काहीही होऊ शकते, असे म्हटले जाते, पुन्हा या दोघांची युती झाली, तर, या एकत्रित युवासेनेविरुद्ध दोन्ही कॉंग्रेसला लढणे जड जाणार, यात शंका नाही.

शिवसेनेच्या युवासेनेचे कॅप्टन खुद्द राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आहेत. तर भाजपची `भाजयुमो` अर्थात भारतीय जनता युवा मोर्चा ही युवा वॉरिअर्सची आघाडी सांभाळणार आहेत. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आहेत. तर, त्यांच्या युवा वॉरिअर्सचे राज्य संयोजक हे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे पिंपरी-चिंचवडकर आहेत. या दोघांनीही युवा वॉरिअर्सच्या बांधणीला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी दोन टप्यांत निम्याहून अधिक राज्याचा दौरा केला आहे. पक्षाच्या ६२ संघटनात्मक जिल्ह्यापैकी ४२ जिल्हे त्यांनी पिंजूनही काढले आहेत. कोकणानंतर नुकतेच ते पूर्व व पश्चिम विदर्भ दौऱ्याहून आले. पुणे,  सांगली शहर, सोलापूर व सातारा  अजून बाकी आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून  युवा वॉरिअर्स संघटनेचा जन्म झाला आहे. तिच्या स्थापनेचा भाजपचा हेतू स्पष्ट व उघड आहे. मात्र, तो विशद करताना पाटील व मोरे म्हणाले, "३५ वर्षापर्यंतच्या तरुणाईत ११ ते २५ या युवावर्गाला तुला काय कळतं,असे सांगून काहीसे दुर्लक्षित केले जाते. त्यांना थांबवले जाते. मात्र, या युवांचेही जिनिअस व वेगळे असे काही खास प्रश्न आहेत.

त्यात आताची ही पिढी, तर खूप स्मार्ट आहे. त्यांना योग्य व्यासपीठ न मिळाल्याने ते सोशल मिडियावर व्यक्त होतात. तेथे त्यांनी टीका करण्यापेक्षा त्यांना टॉक करण्याच्या माध्यमातून तयार करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. त्यांना यंत्रणेचा भाग करावा हा ही उद्देशही युवा वॉरिअर्स तयार करण्यामागे आहे. तसेच, त्यांना आंदोलनात येण्याचीही सक्ती नसून ऐच्छिक आहे. आमचा अजेंडा हा त्यांना राजकारणाला जोडण्याचा आहे. पण, तसे निर्बंध नाहीत. त्यांना देशप्रेमाचे धडे देणार आहोत, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in