पिंपरी महापालिकेत कॅप्टन नसल्याने शिवसेनेच्या जहाजाला हेलकावे.. - As there is no captain in Pimpri Municipal Corporation, the ship of Shiv Sena should be shaken. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पिंपरी महापालिकेत कॅप्टन नसल्याने शिवसेनेच्या जहाजाला हेलकावे..

उत्तम कुटे
मंगळवार, 22 जून 2021

हे पद रिक्त असल्यामुळे पालिका सभेत एकमुखी ठोस भूमिका शिवसेना नगरसेवकांना मांडताच येत नाही. त्यात अगोदरच दोन गटात हा पक्ष विभागला गेला आहे.

पिंपरीः महापालिका निवडणूक सात महिन्यावर आली असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेला तीन महिने झाले,तरी अद्याप गटनेता देण्यात आलेला नाही. त्यामुळे अगोदरच दोन गटात विभागलेले पक्षाचे नगरसेवक त्यांना ठोस भूमिका सभागृहात मांडता येत नसल्याने सैरभैर झाले आहेत. (As there is no captain in Pimpri Municipal Corporation, the ship of Shiv Sena should be shaken.) दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी एका महिलेला ही संधी देण्याचे संकेत सोमवारी (ता.२१)सरकारनामाशी बोलताना दिले.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने लॉकडाऊनचे निर्बंध सैल होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सभा व बैठकाही आता ऑफलाईन होऊ लागल्या आहेत. (Pimpri-chinchwad Municipal Corporation) मात्र,शिवसेनेच्या गटनेतेपदाची नियुक्ती रखडल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. (Shivsena Groupe Leader) संपर्कप्रमुख कदम यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या ६ मे च्या आदेशामुळे ही नियुक्ती रखडल्याचे न पटणारे कारण दिले.

मात्र,हा आदेश फक्त स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुकीपुरताच महिन्याभरासाठी लागू होता. त्याचा गटनेता नियुक्तीशी दूरान्वयेही सबंध नाही. दरम्यान, पुढे ढकलेल्या या निवडणुकीचा आदेशही आता मागे घेण्यात आल्याचे समजते. सर्वसंमतीने गटनेता निवडला जाईल,हे सांगताना तो महिला असण्याची शक्यताही कदम यांनी बोलून दाखवली.

दरम्यान,स्थायी समितीवर ज्यांच्या नियुक्तीचा आदेश पक्षाने दिला होता व जो डावलल्याने गटनेते राहूल कलाटे यांना पद सोडावे लागले, त्या शिवसेनेच्या नगरसेविका व पक्षाचे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे यांना गटनेतेपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले,तर शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांच्यानंतर गटनेतेपदही खासदार श्रीरंग बारणेंच्या समर्थकाकडे जाणार आहे.

स्थायीवर डावलल्याने नुकसानभरपाई म्हणून चिंचवडे यांची यापदी नियुक्ती होण्याचा अंदाज सरकारनामाने अगोदरच वर्तवलेला आहे. चिंचवडेंचे नाव डावलून कलाटे यांनी आपले समर्थक नगरसेविका मीनल यादव यांना स्थायीवर संधी दिल्याने पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे. तो त्यांनी १६ मार्च रोजी दिला. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे पालिका सभेत एकमुखी ठोस भूमिका शिवसेना नगरसेवकांना मांडताच येत नाही.

त्यात अगोदरच दोन गटात हा पक्ष विभागला गेला आहे. पूर्वीही शिवाजीराव आढळराव-पाटील आणि बारणे असे गट होतेच.ते  आता बारणे विरुद्ध कलाटे असे झाले आहेत.पालिकेवर भगवा फडवण्याचे आवाहन नवे शहरप्रमख भोसले यांनी नुकतेच (ता.१९)पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त केले असून आगामी महापौर पक्षाचा करण्याचा शिवसेनेचा मानस आहे.पण, त्यासाठी किमान निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील पक्षाच्या जहाजाला कॅप्टन,तरी लवकरात लवकर द्या,अशी बोलकी व नेमकी भावना शिवसेनेच्याच एका नगरसेवकाने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा ः कट्टर विरोधक बाळा शेळके आणि बाळा भेगडे आले एकाच व्यासपीठावर..

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख