Pimpri-Chinchwad was excluded from the red zone | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडला रेडझोनमधून वगळले 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 मे 2020

राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार शहराला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. नवीन आदेश गुरुवारपासून (ता. 22) अंमलात येणार आहेत. मात्र, कंटेन्मेट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच आदेश लागू राहणार आहेत.

पिंपरी : राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार शहराला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. नवीन आदेश गुरुवारपासून (ता. 22) अंमलात येणार आहेत. मात्र, कंटेन्मेट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच आदेश लागू राहणार आहेत. 

कोरोनाच्या संसर्गामुळे पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमध्ये आहे. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी नवीन आदेश काढला. त्यानुसार शहराला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. मात्र,  सार्वजनिक बस वाहतूक अर्थात एसटी व पीएमपी बस सेवा,  हॉटेल्स, मॉल आणि सलूनची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच, 65 वर्षांवरील व्यक्ती, दहा वर्षांखालील मुले आणि गरोदर स्त्रियांना प्रवास करण्यास मनाई असेल. 

शहरात 69 कंटेन्मेट झोन आहेत. त्यातील 27 झोन नियमातून शिथिल केले आहेत. आता त्याठिकाणी एकही रुग्ण नाही. सध्या 42 कंटेन्मेंट झोन आहेत.  त्या परिसरातील केवळ औषधी व किराना मालाची दुकाने आणि तयार अन्न पुरवठा सेवा सुरू राहील. 

पिंपरी चिंचवड शहरात टॅक्‍सी, कॅब, रिक्षा, खासगी चारचाकी वाहन यातून चालक आणि दोन प्रवाशांनाच प्रवास करण्यास परवानगी असेल. दुचाकीवर एकच जण प्रवास करू शकेल. मात्र, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील मनुष्यबळ पूर्ववत करण्यात येणार आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळले आहे. आदेशाची अंमलबजावणी 22मे पासून केली जाणार आहे. त्याबाबतची नियमावली दोन दिवसांत तयार करून अंमलबजावणी केली जाईल.

हेही वाचा...

निमोणच्या वेशी होणार सील 
संगमनेर : तालुक्‍यातील निमोण येथील 54 वर्षे वयाच्या रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात आज सकाळी मृत्यू झाला. त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह महसूल प्रशासनाने निमोण गावाच्या वेशी सील करण्याचे नियोजन केले असल्याचे समजते. त्यासाठी रात्री उशिरा आरोग्य आणि पोलिस यंत्रणा निमोणला रवाना झाली होती. दरम्यान, निमोण "हॉटस्पॉट' म्हणून घोषित होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. 

न्यूमोनियासदृश लक्षणे असलेल्या निमोणच्या या रुग्णाला श्वसनाचा त्रास होत होता. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीनंतर कोरोनाच्या संशयावरून रविवारी (ता. 17) त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. त्याच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान, त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. 

रहेमतनगरमधील दाघे नगरला 
संगमनेरातून रविवारीच जिल्हा रुग्णालयात पाठविलेल्या संगमनेर शहरातील रहेमतनगर येथील संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला; मात्र तेथील रहिवासी असलेला अन्य एक रुग्ण नाशिक येथे पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या दोन जणांना आज रात्री नगरला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख