स्वबळाचा काँग्रेसला पिंपरीत बसणार फटका; शिवसेनेचा भगवा फडकणे तर लांबच

स्वबळ हे काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांना नुकसानकारक असून आघाडी वा युती फायदेशीर ठरणार असल्याची शहरातील स्थिती आहे.
To fight elections independently Congress will be hit in Pimpri
To fight elections independently Congress will be hit in Pimpri

पिंपरी : आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या काँग्रेसच्या Congress निर्धाराचा पक्षाला पिंपरी-चिंचवडमध्ये Pimpari Chinchwad हमखास फटका बसणार आहे. एकला चलो रे मुळे राज्यभरातही नुकसान होण्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे आघाडी करून निवडणूक लढली, तर शहरात काँग्रेसचे अस्तित्व पुन्हा पालिकेत दिसण्याची शक्यता आहे. परिणामी आघाडीचा फायदा होईल, असा सूर पक्षाच्या एका गटात आहे. To fight elections independently Congress will be hit in Pimpri

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या घेतलेल्या पहिल्याच बैठकीत पुढील निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेत यावर्षी १६ मार्चला दिले होते. त्यावर आज (ता.२३) त्यांनी जळगाव येथे त्यावर शिक्कामोर्तब करीत तसा निर्धारही व्यक्त केला. इकडे, मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढायला पक्षाकडे सेनापतीच नाही. सात महिन्यापूर्वी त्यांचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्ष संधी देत नसल्याने राजीनामा दिला आहे. पक्षाने तो अद्याप स्वीकारलेला नाही.

दुसरीकडे पुन्हा अध्यक्ष होणार नसल्याचे साठेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहर काँग्रेस सध्या द्विधा मनस्थितीत आहे.दुसरीकडे पालिका निवडणूक सात महिन्यांवर आली आहे.तर,इकडे सात महिन्यानंतरही कॉंग्रेसला शहराध्यक्ष मिळालेला नाही.त्यामुळे लढणार कसं असा प्रश्न एका काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यानेच विचारला. शिवसेनेनेही स्वबळाचा नारा बुलंद केला, तर त्यांचीही काहीशी अवस्था काँग्रेससारखी शहरात होणार आहे. त्यांनाही फायदा न होता नुकसानीलाच सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे इतिहास सांगतो आहे. 

कारण विधानसभेला भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर त्यांची शहरातील आमदारकीची एकमेव जागाही २०१९ ला गेली. काँग्रेसच्या अगोदर शिवसेनेनेही स्वबळाची भाषा केली आहे. त्यांचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वबळाची घोषणा केली होती. त्यानुसार शहरातील पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वॉर्ड बैठकांचा धडाका सुरु केला होता. नंतर, त्याला अचानक करकचून ब्रेक लागला. नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर उद्योगनगरीत पहिल्या तिन्ही टर्म १९८६ ते २००२ अशी सलग १५ वर्षे कॉंग्रेस सत्तेत होती. 

प्रा. रामकृष्ण मोरे असेपर्यंत पक्षाला शहरात सोनेरी दिवस होते. त्यानंतर मात्र दिवसागणिक पक्षाला ओहोटी लागली. सध्या,तर त्यांचा एकही नगरसेवक महापालिकेत नाही, एवढी दयनीय अवस्था एकेकाळी निर्विवाद सत्ता असलेल्या काँग्रेसची शहरात झालेली आहे. त्यांचा शहरात एक आमदार नाही. खासदार असणे, तऱ खूप दूरची गोष्ट झाली. पक्षाकडे सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांची संख्या रोडावली आहे. त्यात गटबाजी आहे.

२०१२ व नंतर होते ते नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने २०१७ ला त्यांची पाटी पालिकेत कोरी राहिली. शहरात पक्षाची प्रकृती तोळामासा झाली. स्वबळावर निवडून येईल, असे उमेदवार त्यांच्याकडे नाहीत. गतवेळी, तर त्यांना सर्व जागा लढायला ते मिळालेही नव्हते. त्यामुळे आघाडी केली वा झाली, तर हाताच्या बोटावर मोजता येईल इतके, तरी त्यांचे नगरसेवक निवडून येतील. त्यातून भविष्यात पक्षाला ताकद मिळून बळ वाढेल, म्हणून स्वबळाऐवजी काँग्रेसला शहरात आघाडी फायदेशीर ठरणार आहे. 

शिवसेनेचेही पालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ पंचवार्षिकगणिक कमी होत चालले आहे. २०१२ मध्ये १५ हून २०१७ ला ते नऊवर आले. तरी त्यांची स्वबळाची भाषा आहे. नुकताच (ता.१९) पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त,तर पालिकेवर भगवा फडकावण्याची घोषणा शहरप्रमुखांनी केली आहे.ते,तर स्वप्नरंजनच म्हणावे लागेल. त्यामुळे किमान नगरसेवकांची संख्या व शहरातील पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेलाही युती वा आघाडीशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्या खासदारांची संख्या २०१९ ला शहरात दोनवरून एक,तर आमदारांचा आकडा,तर एकवरून शून्य झाला आहे. नगरसेवकाचे बळ,तर त्याअगोदरच घटले आहे. परिणामी, स्वबळ हे काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांना नुकसानकारक असून आघाडी वा युती फायदेशीर ठरणार असल्याची शहरातील स्थिती आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com