आळंदी ग्रामीण रुग्णालयात इर्मजन्सी एक्झिटच नाही;  भाजप महिला मोर्चाच्या ऑडिटमध्ये आढळली त्रूटी

अग्निशमन यंत्रणा व इर्मजन्सी एक्झिट आहे का, २४ तास वीज आणि पुरेसा स्टाफ आहे का, आदी १४ मुद्यांवर ते करण्यात येत आहे. त्यात आढळणाऱ्या त्रूटी मुख्यमंत्र्यांना एकत्र कळविल्या जाऊन त्या दूर करण्यास सांगण्यात येणार असल्याचे खापरे यांनी आज सरकारनामाला सांगितले.
There is no emergency exit at Alandi Rural Hospital; An error was found in the audit of BJP Mahila Morcha
There is no emergency exit at Alandi Rural Hospital; An error was found in the audit of BJP Mahila Morcha

पिंपरी : भंडारा ग्रामीण रुग्णालयातील जळीतकांडानंतर (ता.९) भाजप महिला मोर्चाने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे ऑडिट सुरु केले. त्यात अनेक त्रूटी आढळत आहेत. आळंदी (ता.खेड जि.पुणे) ग्रामीण रुग्णालयात आगीनंतर बाहेर पडण्याचा मार्गच (इर्मजन्सी एक्झिट) नसल्याचे दिसून आले.

भंडारा रुग्णालयात आग लागून त्यात दहा नवजात अर्भके दगावली होती. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या घटनेनंतर प्रदेश भाजप महिला मोर्चाने राज्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांची पाहणी करण्याची मोहीम कालपासून सुरु केली. ती तीन दिवस चालणार आहे.

त्याअंतर्गत महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी काल पुण्यातील ससून रुग्णालयाचा आढावा घेतला. तर प्रदेश कोषाध्यक्षा शैला मोळक व सहकाऱ्यांनी आळंदी रुग्णालयाचे ऑडिट केले. तीन दिवसांत राज्यभरातील सरकारी रुग्णालयांचे ऑडिट तेथील महिला मोर्चाच्या पदाधिकारी करणार आहेत.

अग्निशमन यंत्रणा व इर्मजन्सी एक्झिट आहे का, २४ तास वीज आणि पुरेसा स्टाफ आहे का, आदी १४ मुद्यांवर ते करण्यात येत आहे. त्यात आढळणाऱ्या त्रूटी मुख्यमंत्र्यांना एकत्र कळविल्या जाऊन त्या दूर करण्यास सांगण्यात येणार असल्याचे खापरे यांनी आज सरकारनामाला सांगितले. आळंदीत रुग्णालयात संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्गच (इर्मजन्सी एक्झिट) नसल्याचे दिसून आले. 

तसेच तेथे शिशू अतिदक्षता विभागही नसल्याचे आढळले,असे या पाहणीनंतर मोळक यांनी सांगतिले.सातपैकी एका नर्सचे पद रिक्त होते. आळंदीच्या नगराध्यक्ष वैजंयता उमरगेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य कोमल काळभोर, पिंपरी चिंचवड सचिव शोभा भराडे, पिंपरी चिंचवड महिला मोर्चा चिटणीस प्रज्ञा हिटनाळीकर, आळंदीच्या नगरसेविका रुक्मिणी कांबळे आदी या पाहणीत सहभागी झाल्या होत्या.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com