गरज नसताना रेमडेसिव्हिर दिल्याने तुटवडा; खाटा वाढविण्यासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घ्या.....

ऑक्सिजनव व्हेंटिलेटरचे बेड, तर खूपच मर्यादित आहेत. त्यामुळे अधिकच्या खाटा उपलब्ध कराव्यात. तसेच खासगी रूग्णालये ताब्यात घेवून खाटांची संख्या वाढवावी. प्रशासनाने कठोर पाऊले उचलून उपाय करावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गरज नसताना रेमडेसिव्हिर दिल्याने तुटवडा; खाटा वाढविण्यासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घ्या.....
Take over private hospitals to increase the number of beds says MP Shrirang Barne

पिंपरी : रेमडेसिव्हिरची आवश्यकता नसतानाही डॉक्टर ते देत असल्याचे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा आरोप मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज केला. तसेच त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ आणि पिळवणूकही होत असल्याने आवश्यकता असेल, तरच रुग्णांना हे इंजेक्शन देण्याची सुचना जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

वाढते कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यूबद्दल बारणे यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. तसेच लसीच्या साठवणुकीसाठी शहरामध्ये कोल्ड स्टोरेजची संख्या कमी पडत असून त्यामध्ये वाढ करण्यासही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या बळींमुळे विद्युत दाहिनींत अंत्यविधीला वेळ लागत असून कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी स्माशानभूमीत इतर व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा, असे त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांना सुचविले आहे.

दररोज तीन हजाराच्या आसपास नवीन रुग्ण शहरात आढळत असल्याने सध्या पालिका व खासगी रूग्णालयात खाटाच मिळत नाहीत. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड, तर खूपच मर्यादित आहेत. त्यामुळे अधिकच्या खाटा उपलब्ध कराव्यात. तसेच खासगी रूग्णालये ताब्यात घेवून खाटांची संख्या वाढवावी. प्रशासनाने कठोर पाऊले उचलून उपाय करावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in