सातारचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट झाले पिंपरी चिंचवडचे उपआयुक्त   - Satara Palika CO Abhijit Bapat became the Deputy Commissioner of Pimpri Chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

सातारचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट झाले पिंपरी चिंचवडचे उपआयुक्त  

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 19 जून 2021

  बापट यांच्‍या बदलीमुळे रिक्‍त झालेल्‍या सातारा पालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

सातारा : सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांची बदली झाली असून त्‍यांच्‍याकडे पदोन्नतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्‍या उपआयुक्‍तपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे. 

सातारा पालिकेचे मुख्‍याधिकारी म्‍हणून अभिजित बापट यांनी यापूर्वी कामकाज केले होते. कार्यकाळ पूर्ण झाल्‍यानंतर बापट यांची पंढरपूर पालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी बदली करण्‍यात आली. बापट यांच्‍या बदलीमुळे रिक्‍त झालेल्‍या जागी शासनाने शंकर गोरे यांची नियुक्‍ती केली. गोरे यांच्‍या बदलीनंतर सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयात नगरपालिका कक्षाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या बापट यांच्‍याकडे पुन्‍हा सातारा पालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदाची सूत्रे सोपविण्‍यात आली. 

हेही वाचा : सातारा अनलॉक; वेळेच्या मर्यादेत सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टारंट सोमवार ते शुक्रवार सुरु

सूत्रे स्‍वीकारल्‍यानंतर त्‍यांनी शहराच्‍या विकासासाठीच्‍या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. बापट यांची नगरविकास विभागाने काल रात्री एका आदेशानुसार बदली केली. बापट यांच्‍याकडे पदोन्नतीने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्‍या उपाआयुक्‍तपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.  बापट यांच्‍या बदलीमुळे रिक्‍त झालेल्‍या सातारा पालिकेच्‍या मुख्‍याधिकारीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे. 

आवश्य वाचा : पीक कर्ज वाटपासाठी बॅंकांना अजित पवारांनी दिली १५ जुलैची डेडलाईन..

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख