राष्ट्रवादी, सेना, एमआयएमचा विरोध मोडीत काढत पिंपरी पालिकेकडून 'पे ॲन्ड पार्क' सुरू  

दुचाकी आणि रिक्षाला शहरातील १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील साडेचारशे ठिकाणी पार्किंगसाठी पाच, तर मोटारीला दहा रुपये एका तासाकरिता मोजावे लागणार आहेत. तर, बससाठी हे शुल्क शंभर रुपये आहे.
राष्ट्रवादी, सेना, एमआयएमचा विरोध मोडीत काढत पिंपरी पालिकेकडून 'पे ॲन्ड पार्क' सुरू  
Pimpri Municipality launches 'Pay and Park' overcoming opposition of NCP, Shivsena and MIM

पिंपरी : विरोधी पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएमचा विरोध मोडून काढत भाजप सत्ताधारी पिंपरी महापालिकेने 'पे ॲन्ड पार्क' या आपल्या पार्किंग धोरणाचा गुरुवारपासून अंमल सुरू केला. कोरोना काळातील हा दिवसाढवळ्या खंडणीचा प्रकार असल्याचे सांगून हे धोरण रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. भाजपचे शहर सरचिटणीस राजू दुर्गे यांनीही ही पॉलिसी थांबवण्याची मागणी करीत घरचा आहेर दिला होता.Pimpri Municipality launches 'Pay and Park' overcoming opposition of NCP, Shivsena and MIM

महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतःची मोटार पालिकेसमोरील 'पे अॅन्ड पार्क' मध्ये पावती फाडून उभी करीत पार्किंग धोरणास हिरवा कंदिल दाखवला. त्यानुसार आता दुचाकी आणि रिक्षाला शहरातील १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील साडेचारशे ठिकाणी पार्किंगसाठी पाच, तर मोटारीला दहा रुपये एका तासाकरिता मोजावे लागणार आहेत. तर, बससाठी हे शुल्क शंभर रुपये आहे. पहिल्या टप्प्यात ८० जागांचा समावेश आहे. 

कोरोना काळात पार्कींगच्या नावाखाली भाजपचा हा लुटीचा डाव असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी काल या धोरणाला कडाडून विरोध केला होता. तर, गरज नसताना केवळ ठेकेदार व सत्ताधारी यांचे खिसे भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याने ते रद्द करण्याची मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनीही आय़ुक्तांकडे कालच केली होती. 

सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या खिशातून खंडणी उकळण्याचा हा उद्योग त्वरित थांबवावा, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला होता. या धोरणातून लुबाडणूक होणार असल्याने ते रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन करू, असे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर यांनी सांगितले होते.तर, ही पॉलिसी चुकीची व घातक असल्याने ती मागे घेण्याची मागणी भाजपचे शहर सरचिटणीस राजू दुर्गे यांनी करीत घरचा आहेर दिला होता. हा दिवसाढवळ्या खंडणी उकळण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in