सल्लागारांकडूनही पिंपरी पालिकेची फसवणूक ; पॅनेलवर आढळला बनावट सल्लागार

बनावट एफडीआऱ देणाऱ्या दोषी ठेकेदारांप्रमाणे या बनावट सल्लागारालाही आयुक्तांनी काळ्या यादीत टाकून त्याच्याविरुद्धही फौजदारीचा आदेश दिला आहे.
 सल्लागारांकडूनही पिंपरी पालिकेची फसवणूक ; पॅनेलवर आढळला बनावट सल्लागार
Pimpri Municipality cheated by consultants; Fake consultant found on panel

पिंपरी : बोगस एफडीआर सादर करून पिंपरी पालिकेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याबद्दल पोलिसांनी आणखी तीन ठेकेदारांविरुद्ध बुधवारी (ता.३०)गुन्हा दाखल केला. मात्र अटकेच्या पुढील कारवाईस विलंब होत आहे. आतापर्यंत दहा ठेकदारांविरुद्ध पालिकेने हे फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. Pimpri Municipality cheated by consultants; Fake consultant found on panel

दरम्यान, ठेकेदारानंतर पालिका सल्लागारांचीही बनावटगिरी पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी उजेडात आणली आहे. खोटी कागदपत्रे सादर करून प्रकल्प सल्लागार म्हणून एकाने पालिकेच्या पॅनेलवर नियुक्ती करून घेतल्याचे आढळले आहे. त्यामुळे बनावट एफडीआऱ देणाऱ्या दोषी ठेकेदारांप्रमाणे या बनावट सल्लागारालाही आयुक्तांनी काळ्या यादीत टाकून त्याच्याविरुद्धही फौजदारीचा आदेश दिला आहे. 

मे. कावेरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंन्ट तर्फे संतोष किरनळ्ळी यांनी मनपाच्या प्रकल्प सल्लागार पॅनेलवर अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र् सादर करून प्रकल्प सल्लागार पॅनेलवर नेमणूक मिळवली होती. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर सदरची बाब निदर्शनास आली. दरम्यान, त्रिमूर्ती कंस्ट्रक्शनचे संदीप सुखदेव लोहार (रा. तळेगाव दाभाडे,ता.मावळ,जि.पुणे),भैरव कंस्ट्रक्शनचे नंदकुमार मथुराम ढोबळे (वय ३४, रा. रुपीनगर,पिंपरी-चिंचवड) दत्तकुमार एंटरप्रायजेसचे दत्तात्रेय महादेव थोरात (वय ३९, रा.चिंचवड) अशी काल गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत.

पालिकेला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या यापैकी कुणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.लोहार यांनी सव्वाकोटी रुपयांचे रंगीत पेव्हींग ब्लॉक बसविण्याचे काम घेऊन त्यापोटी अडीच लाखाची बनावट एफडी पालिकेत जमा केली होती.ढोबळे यांनी तीस लाखाच्या गटारकामाची निविदा भरून त्यांनीही अडीच लाखाची एफडी सादर केलेली आहे.तर, थोरात यांनी ८३ लाखाचे स्मशानभूमी नुतनीकरणाच्या कामासाठी यांनी १७ लाख व दीड लाखाच्या दोन बोगस बनावट बॅंक गॅरंटी दिलेल्या आहेत.

आतापर्यंत काही ठेकेदारांचा गैरकारभार बिनबोभाट सुरु होता.मात्र, पाटील आयुक्त म्हणून येताच त्यांनी तो उघड केला. त्यांनी बोगस एफडी देणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत,तर टाकलेच, शिवाय त्यांच्याविरुद्ध फौजदारीही केली. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढी घाऊक फौजदारी कारवाई ठेकेदारांविरुद्ध झाली.

१)मे.डी.डी.कन्स्ट्रक्शन, २) मे.वैदेही कन्स्ट्रक्शन, ३) मे.एस.बी.सवई, ४) मे.पाटील अँण्ड असोसिएट्स, ५) मे.कृती कन्स्ट्रक्शन, ६) मे.राधिका कन्स्ट्रक्शन, ७) मे.बी.के.कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजिनिअरींग, ८) मे.भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, ९) मे.त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, १०) मे.श्री दत्तकृपा एंटरप्रायजेस, ११) मे.चैतन्य एंटरप्रायजेस, १२) मे.डी.जे.एंटरप्रायजेस, १३) मे.दीप एंटरप्रायजेस, १४) मे.बी के खोसे, १५) मे.म्हाळसा कन्स्ट्रक्शन प्रा.लि., १६) मे.एच ए भोसले, १७) मे.सोपान जनार्दन घोडके व १८)मे.अतुल आर.एम.सी. यांनी सादर केलेल्या बँक गॅरंटी / एफ.डी.आर. बनावट असलेचे आढळून आले आहे.

त्यांना आयुक्तांनी तीन वर्षे काळ्या यादीत टाकले.तसेच त्यातील मे.डी.डी.कन्स्ट्रक्शन, मे.वैदेही कन्स्ट्रक्शन, मे.एस.बी.सवई, मे.पाटील अँण्ड असोसिएट्स, मे.कृती कन्स्ट्रक्शन, मे.राधिका कन्स्ट्रक्शन, मे.बी.के.कन्स्ट्रक्शन अँण्ड इंजिनिअरींग, मे.भैरवनाथ कन्स्ट्रक्शन, मे.त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, मे.श्री दत्तकृपा एंटरप्रायजेस अशा एकूण १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल केले.मे.चैतन्य एंटरप्रायजेस, मे.डी.जे.एंटरप्रायजेस, मे.दीप एंटरप्रायजेस या ठेकेदार संस्थांच्या मालक महिला असून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून न आल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न करता त्यांना ४ वर्षासाठी काळ्या यादीत टाकले.

मे.अतुल आर.एम.सी. यांनी संबंधीत प्रकरणी दोषी असणा-यांवर स्वतः गुन्हा दाखल केलेला असून काळ्या यादीत समाविष्ट केल्याच्या आदेशाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही.उर्वरित मे.एच ए भोसले, मे.सोपान जनार्दन घोडके यांच्यावर ती करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in