पिंपरी चिंचवडला लसीचे डोस मिळाले १५ हजार, घेणारे आहेत १८ हजार

खरं, तर अधिक संख्येने कोरोना लसीचे डोस मिळायला हवे होते. मात्र, केंद्राकडून राज्याला कमी पुरवठा झाल्याने शहराला कोरोना लस कमी मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्प्यात ती देण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडला लसीचे डोस मिळाले १५ हजार, घेणारे आहेत १८ हजार
Pimpri Chinchwad received 15,000 doses of vaccine, 18,000 recipients

पिंपरी : येत्या शनिवारपासून (ता. १६)  सुरु होणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी पिंपरी चिंचवडमध्ये १७ हजार ७९२ आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. दुसरीकडे, कोरोना लसीचे १५ हजारच डोस काल मिळाल्याने पालिकेला पहिल्या टप्प्यातच लसीकरणासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

दरम्यान, कोरोना लसीकरणामुळे पल्स पोलिओ लसीकरणाची रविवारी (ता. १७) होणारी मोहिम पुढे गेली आहे. केंद्रानेच पल्स पोलिओ लसीकरण मोहिम स्थगित केल्याने ती पुढे ढकलल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातून सांगण्यात आले. 

कोरोनाचा सर्वाधिक विळखा उद्योगनगरीसह पुणे जिल्ह्याला बसलेला आहे. त्यामुळे तेथे खरं, तर अधिक संख्येने कोरोना लसीचे डोस मिळायला हवे होते.  मात्र, केंद्राकडून राज्याला कमी पुरवठा झाल्याने शहराला कोरोना लस कमी मिळाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पहिल्या टप्प्यात ती देण्यात येणार आहे.

नंतर पोलिस, ज्येष्ठ नागरिक व इतरांना टप्याटप्याने ती दिली जाणार आहे. त्याची जय्यत तयारी पालिकेने केली आहे. १६ पालिका आणि खासगी दवाखाने व रुग्णालयात नोंदणी केलेल्यांनाच ती देण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता प्रथम कागदपत्रे, फोटो व आयडी तपासला जाईल. त्यानंतर लस देण्यात येईल. लस दिल्यानंतर अर्धातास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. काही त्रास होत नसल्यासच घरी सोडले जाणार आहे.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in