पिंपरी चिंचवड महापालिका : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी लांडगे, काटेंत काट्याची टक्कर - Pimpri Chinchwad Municipal Corporation: Shatrughan Kate and Ravi Landage vie for the post of Standing Committee Chairman | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

पिंपरी चिंचवड महापालिका : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी लांडगे, काटेंत काट्याची टक्कर

उत्तम कुटे
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

लांडगे हे बिनविरोध निवडून आलेले असून त्यांना आतापर्यंत एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी दोन भाजप नगरसेवकांसह अजित पवार यांची पुण्यात भेट घेताच मोठा धुरळा उडाला होता. दुसरीकडे भाऊ समर्थक काटेंनाही गेल्या चार वर्षात पद देण्यात आलेले नाही. ते, तर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा दोन्ही पदांसाठी दावेदार होते.

पिंपरी : आशियातील श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे शेवटच्या वर्षासाठीचे निम्मे कारभारी निवडले गेल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. ते शहराचे कारभारी आमदार महेशदादांच्या भोसरीकडे कायम राहते की दुसरे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊच्या चिंचवडकडे जाते, याकडे लक्ष लागले आहे. त्यासाठी गेल्या चार वर्षात एकही पद न मिळालेले चिंचवडमधील शत्रूघ्न काटे आणि भोसरीतील रवी लांडगे यांची नावे चर्चेत आहेत. 

एक, मात्र नक्की की वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही निवड करताना भाजपला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण गेल्या चार वर्षात एकही पद न मिळाल्याने अनेक नगरसेवक नाराज आहेत. तर, काहीजण पक्षच सोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांची नाराजी दूर करावी लागणार असून दुसरीकडे एकनिष्ठ जुन्या समर्थकांचाही विचार करावा लागणार आहे. 

दादा आणि भाऊ समर्थकांत समसमान पद वाटपाचा फॉर्म्यूला कायम ठेवला, तर मात्र स्थायी समिती अध्यक्षपद हे भोसरीकडे जाऊ शकते. तसे झाले, तर रवी लांडगे यांचे पारडे जड होईल. कारण सध्या महापौरपदी चिंचवडमधील भाऊ समर्थक आहेत. एकूणच पदे कमी आणि दावेदारी अधिक यामुळे पालिकेत गेल्या चार वर्षात विशेष करून या दोन पदांचा फिरता रंगमंच झालेला आहे.

लांडगे हे बिनविरोध निवडून आलेले असून त्यांना आतापर्यंत एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी दोन भाजप नगरसेवकांसह अजित पवार यांची पुण्यात भेट घेताच मोठा धुरळा उडाला होता. दुसरीकडे भाऊ समर्थक काटेंनाही गेल्या चार वर्षात पद देण्यात आलेले नाही. ते, तर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा दोन्ही पदांसाठी दावेदार होते. त्यामुळे आता शेवटच्या वर्षात पालिकेच्या खजिन्याची चावी, तरी त्यांना मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख