विरोधात बातम्या छापण्याची धमकी देत पाच लाख उकळणाऱ्या पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा

स्पर्श हॉस्पिटल हे सप्टेंबर २०२० पासून अ‍ॅटोक्लस्टर कोविड सेंटर चालवत आहे. भाकरेने स्पर्शच्या डॉक्टर व संचालकांशी संपर्क सांधून माझी आर्थिक मागणी पूर्ण करा नाही, तर मी तुमच्या संस्थेच्या विरोधात रान उठवेन. तुमच्या संस्थेच्या विरोधात बातम्या देऊन तुमच्या संस्थेचा ठेका बंद करण्यास भाग पाडेन, असे धमकाविले.
विरोधात बातम्या छापण्याची धमकी देत पाच लाख उकळणाऱ्या पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा
FIR has been lodged against a reporter of a marathi daily for demanding & accepting 5 lac of rs as extorion

पिंपरी : विरोधात बातम्या छापण्याची धमकी देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpari Chinchwad Corporation) कोविड सेंटर (Covid Center) चालक रुग्णालयाकडून पाच लाख रुपये घेतलेल्या पत्रकाराविरुद्ध पिंपरी पोलिसांनी काल (ता.१२) खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पुण्यातील एका मराठी दैनिकाचा (Marathi Daily) पिंपरी-चिंचवडचा ब्यूरो चीफ आहे. सुहास संभाजी भाकरे (वय ४३) असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याने पिंपरी पालिका मुख्यालयाबाहेर दोन लाख रोख,तर तीन लाख रुपये आपल्या बॅंकेच्या खात्यावर नेफ्टव्दारे घेतले आहेत. (FIR has been lodged against a reporter of a marathi daily for demanding & accepting 5 lac of rs as extorion)

त्याच्याविरु्द्ध चिंचवड येथील ऑटोक्लस्टर कोरोना सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल होळकुंदे (वय ३८, रा. सोमाटणे फाटा, ता़ मावळ)यांनी फिर्याद दिली आहे. अद्याप आरोपीला अटक केली नसल्याचे तपासाधिकारी वाघमारे यांनी सांगितले. मोफत बेडसाठी एक लाख रुपये रुग्णाकडून याच कोविड सेंटरमधील डॉक्टरने घेतल्याने ते नुकतेच वादात सापडलेले आहे. त्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यात सदर डॉक्टर व त्याचे तीन साथीदार डॉक्टर अशा चौघांना अटकही झाली होती. 

त्यानंतर याच सेंटरमधील एका कर्मचाऱ्याला रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच अटक केल्यानंतर या सेंटरचे व्यवस्थापन ते चालविणाऱ्या फॉर्च्यून स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि.या ठेकेदार संस्थेकडून पालिकेने आता काढून घेतले आहे. याच संस्थेने गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत भोसरीतील आपल्या दोन कोरोना सेंटरमध्ये एकाही रुग्णाला दाखल करून न घेताही पालिकेकडून सव्वातीन कोटी रुपये घेतले होते.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्श हॉस्पिटल हे सप्टेंबर २०२० पासून अ‍ॅटोक्लस्टर कोविड सेंटर चालवत आहे. भाकरेने स्पर्शच्या डॉक्टर व संचालकांशी संपर्क सांधून माझी आर्थिक मागणी पूर्ण करा नाही, तर मी तुमच्या संस्थेच्या विरोधात रान उठवेन. तुमच्या संस्थेच्या विरोधात बातम्या देऊन तुमच्या संस्थेचा ठेका बंद करण्यास भाग पाडेन, असे धमकाविले. 

२७ नोव्हेंबर २०२० रोजी त्याने संस्थेचे संचालक विनोद आडसकरांना मी कोविड केअर सेंटरबाबत तक्रारी करीत आहे. मी तुमचे बिल अडकवून ठेवीन. माझ्या मागणीचा विचार करा. असा वकिलाच्या नावे असलेली नोटीस व्हाटसअपवर दिली.  तसाच दुसरा मेसेज ८ डिसेंबर २०२० रोजी पाठविला. २३ फेबुवारी २०२१ रोजी भाकरेने पालिकेबाहेर डॉ. होळकुंडेंकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पत्रकारास विरोध करायला नको, या भितीपोटी त्यांच्या संस्थेने भाकरेला ५ लाख रुपये दिले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in