तहसीलदारांच्या नावे पन्नास लाखांची मागणी; तब्बल दीड वर्षानंतर गुन्हा दाखल - Demand of Rs. 50 lakhs in the name of Pimpri-Chinchwad Tehsildar; Filed a crime after a year and a half | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

तहसीलदारांच्या नावे पन्नास लाखांची मागणी; तब्बल दीड वर्षानंतर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 जुलै 2021

पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचा खुलासा 'सरकारनामा'शी बोलताना केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदारांच्या नावे पन्नास लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती मागणाऱ्याविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) निगडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून लाचखोरीचा गुन्हा गुरुवारी (ता.१) दाखल झाला. गेल्यावर्षीची ही घटना आहे. त्याबाबत तब्बल दीड वर्षानंतर गुन्हा दाखल झाला, हे विशेष. Demand of Rs. 50 lakhs in the name of Pimpri-Chinchwad Tehsildar; Filed a crime after a year and a half

दिलीप दंडवते (रा. साई पार्क,दिघी) असे आऱोपीचे नाव आहे. यातील तक्रारदारांच्या मित्राच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नव्याने नोंद झालेली काही नावे काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदारांपुढे होती. त्याचा निकाल तक्रारदाराच्या मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी दंडवतेने ही लाच तहसीलदारांसाठी मागितली होती.

हेही वाचा : मोठी बातमी : गडकरी, जावडेकर, गोयल अन् इराणींचा भार होणार हलका

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचा खुलासा सरकारनामाशी बोलताना केला. गेल्यावर्षी एक जानेवारीला याबाबत निकाल दिला असून त्यानंतर २२ जानेवारीला लाच मागितली गेल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.असे अनेक निकाल दिले जातात. नंतर त्याचा कोण काय गैरवापर करतं,त्याच्याशी काही सबंध उरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच लाच मागितलेल्या दंडवतेला ओळखतही नसल्याचे त्यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख