मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच केले कोरोना मृतावर अंत्यसंस्कार; रूग्णसंख्या वाढल्याने वैद्यकिय विभागावर ताण 

चिखले व सहकाऱ्यांनी मृतदेह वायसीएम रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन व इतर पक्रिया पूर्ण करून कोरोना प्रतिबंधक आवरणात गुंडाळून तो ताब्यात मिळण्यास मध्यरात्र झाली. मृतदेह निगडी विद्युतदाहिनीत नेला,तर तिथे अगोदरच कोरोनाची बॉडी जळत असल्याने प्रतिक्षा करावी. सरतेशेवटी पहाटे नंबर लागून सकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार झाले आणि चिखले आणि सहकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच केले कोरोना मृतावर अंत्यसंस्कार; रूग्णसंख्या वाढल्याने वैद्यकिय विभागावर ताण 
Corona cremated by MNS office bearers

पिंपरी : कोरोनाने पिंपरी-चिंचवडमध्ये काल (ता.१४) ६१, आज (ता.१६) ५४ जणांचा बळी गेला. तर या दोन दिवसांत अनुक्रमे २०८६ आणि २५२९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनावर त्यातही वैद्यकीय विभागावर कामाचा मोठा ताण आला आहे. परिणामी कोरोनाने घरीच मृत्यू झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला नेण्यासाठी महापालिकेची रुग्णवाहिका व कर्मचारी तीन तास आलेच नाहीत. त्यामुळे मनसेचे स्थानिक नगरसेवक व गटनेते सचिन चिखले व पदाधिकाऱ्यांनाच पीपीई कीट घालून या मृत ज्येष्ठाला प्रथम रुग्णालयात व तेथून स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागले.

कोरोनाचा उद्रेक किती मोठा व त्याचा प्रशासनावर तेवढाच ताण किती आहे, याचा प्रत्यय या ज्येष्ठाच्या मृत्यूने काल आला. कारण काल सकाळी ११ वाजता मृत्यू पावलेल्या या ज्येष्ठाचा अंत्यविधी व्हायला आज पहाटेचे पाच वाजले.म्हणजे सलग १८ तास चिखले व त्यांच्या कार्यकर्त्यांना उसंतच मिळाली नव्हती.शहरातील परिस्थिती खूप विदारक व गंभीर झाल्याने आम्ही सुद्धा हतबल झाल्याचे सांगताना चिखले यांनी सांगितले.

त्यामुळे सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी आपल्या प्रभागातील रहिवाशांनाच नाही, तर संपूर्ण शहरवासियांना केले आहे. कोरोना होऊनही तो अंगावर काढला व तपासणीच न करून घेणे या ज्येष्ठाच्या जीवावरच बेतले. त्यात मुलबाळ नसल्याने त्यांच्या घरी फक्त त्यांची पत्नी होती. त्यामुळे त्यांचे निधन झाल्यावरही ना पालिकेची रुग्णवाहिका (शववाहिका) आली ना त्यांचे कर्मचारी वा इतर कोणी.हे समजताच स्थानिक नगरसेवक चिखले धावून गेले.

त्यांनी प्रथम स्वखर्चातून पीपीई कीट खरेदी केले. ते आपले सहकारी वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष सुशांत साळवी, उपशहराध्यक्ष नितीन शिंदे, विशाल मानकरी, जेकब मॅथ्यू, संजूमामा फ्रान्सिस आणि दत्ता देवतरासे यांना दिले. त्यांनी ते घालून त्यांनी ज्येष्ठाचा मृतदेह घराबाहेर काढला. तोपर्यंत प्रभागातील भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पालिकेची रुग्णवाहिका आणि स्मशानभूमीतील कामगार बोलावून घेतली होती.

चिखले व सहकाऱ्यांनी मृतदेह वायसीएम रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन व इतर पक्रिया पूर्ण करून कोरोना प्रतिबंधक आवरणात गुंडाळून तो ताब्यात मिळण्यास मध्यरात्र झाली. मृतदेह निगडी विद्युतदाहिनीत नेला,तर तिथे अगोदरच कोरोनाची बॉडी जळत असल्याने प्रतिक्षा करावी. सरतेशेवटी पहाटे नंबर लागून सकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार झाले आणि चिखले आणि सहकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in