वसई-विरारमध्ये राष्ट्रवादीची अजून धडपडच!

सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी राष्ट्रवादी मात्र, मागे राहिली आहे. राष्ट्रवादीला आशा आहे कि राज्यात सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षाची येथे युती होईल. तसेच येथील गेल्या दोन निवडणुकीत सत्तेवर असलेला बविआ पक्ष ही यात सामील होईल आणि आपल्या वाट्याला काही जागा येतील.
NCP still struggles in Vasai-Virar!
NCP still struggles in Vasai-Virar!

विरार : राज्यात अनेक वर्षांपासून आपला दबदबा राखून असलेली राष्ट्रवादी काँग्रेसने आपला २२ वा वर्धापन दिन साजरा केला, म्हणजेच एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस आता वयात आली आहे. परंतु याच राष्ट्रवादी काँग्रेसला NCP वसई Vasai विरारमध्ये Virar मात्र आपले अस्तित्व अजून सिद्ध करता आलेले नाही. महापालिकेच्या दोन निवडणुकीत राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फळी उभी करता आलेली नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार कि युतीत यावर त्यांचा पालिकेतील मार्ग ठरणार आहे.  NCP still struggles in Vasai-Virar!

सर्वच मोठ्या पक्षाचे नेते निवडणुकीच्या तयारीत असताना राष्ट्रवादीचे नेते मात्र अजूनही याठिकाणी फिरकताना दिसून येत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ वर्षे झाली राज्यात ठिकठिकाणी आपली छप सोडणार्या या पक्षाला वसई विरारमध्ये आजही आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी आपल्यापरीने पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षाला दिशा देण्याऐवजी ते इतर वादातच जास्त अडकून पडल्याने राष्ट्रवादीची वाढ झाली नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

तर आताचे नवीन अध्यक्ष राजाराम मुळीक हे पुन्हा एकदा पक्षात नवं संजीवनी निर्माण करण्याचे प्रयत्न करत असले तरी ते कितपत यशस्वी होतील हे येणाऱ्या निवडणुकीतच दिसणार आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर वसई तालुक्यात असलेल्या चार नगरपालिकांपैकी नवघर, माणिकपूर नगरपालिकेत तीन नगरसेवक निवडून आले. बहुजन विकास आघाडी बरोबर युती करून राजाराम मुळीक, राजेंद्र कांबळी आणि मनोज राय हे तिघे निवडून आले होते.

परंतु त्यातील मनोज राय हे बविआचेच होते. ते निवडणुकीनंतर स्वगृही परतले. तर दुसरा नगरसेवक राजेंद्र कांबळी महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी बविआमध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादीकडे महापालिकेसाठी मोठा पेच निर्माण झाला होता.  नगरपालिकेची हि स्थिती तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत वेगळी स्थिती कधी नव्हती. स्वबळावर तालुक्यातील एकही ग्रामपंचायत राष्ट्रवादीला जिंकता आली नाही.

सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी राष्ट्रवादी मात्र, मागे राहिली आहे. राष्ट्रवादीला आशा आहे कि राज्यात सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षाची येथे युती होईल. तसेच येथील गेल्या दोन निवडणुकीत सत्तेवर असलेला बविआ पक्ष ही यात सामील होईल आणि आपल्या वाट्याला काही जागा येतील. परंतु या ठिकाणी मात्र सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देऊ लागल्याने यावेळी ही राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक सुरु होणार कि घड्याळात पुन्हा एकदा 10 च वाजणार हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com