शशिकांत शिंदेंची गावातच पराभवाची हॅटट्रीक; महेश शिंदेंच्या पॅनेलचा विजय

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना आपल्याच गावात (मतदान असलेल्या) त्यांच्या विचाराच्या पॅनेलला सलग तीन वेळा पराभव स्विकारावा लागला आहे.
MLA Mahesh Shinde's panel wins in Lhasurne Gram Panchayat
MLA Mahesh Shinde's panel wins in Lhasurne Gram Panchayat

कोरेगाव : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासूर्णे गावात निवडणूकीत कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे तसेच सोपान मचींदर, किसनराव सावंत आदींच्या नेतृत्वाखालील नवलाईदेवी ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर शशिकांत शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले असून त्यांच्या पॅनेलचा सलग तीन वेळा पराभव झालेला आहे.  

कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे गाव आहे. त्यांनी नवलाईदेवी परिवर्तन विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती. आज झालेल्या मतमोजणीत त्यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे.

कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे तसेच सोपान मचींदर, किसनराव सावंत आदींच्या नेतृत्वाखालील नवलाईदेवी ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर शशिकांत शिंदे यांच्या गटाच्या परिवर्तन पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.  राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना आपल्याच गावात (मतदान असलेल्या) त्यांच्या विचाराच्या पॅनेलला सलग तीन वेळा पराभव स्विकारावा लागला आहे.

कोरेगाव तालुक्यातील मंगळापुर, पेठ किन्हई व कठापुर ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटाने आघाडी घेतली आहे. तर मंगळापुरमध्ये आमदार महेश शिंदे गटाला सात, आमदार शशिकांत शिंदे गट शुन्य जागा मिळाल्या आहेत. पेठ किन्हईत आमदार महेश शिंदे गटाला पाच तर आमदार शशिकांत शिंदे गटाला चार जागा आघाडीवर होत्या. 

कठापुरमध्ये आमदार महेश शिंदे गट पाच तर आमदार शशिकांत शिंदे गट चार जागांवर आघाडी मिळाली होती.  विसापूरमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराच्या सागर साळुंखे गटाने 13 पैकी नऊ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता कायम राखली आहे. 

जाखणगाव ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांच्या गटाने वर्चस्व मिळवत सहा विरुद्ध तीनच्या फरकाने विजय मिळविला आहे. कोरेगाव तालुक्यात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com