अश्विनी बिद्रे हत्या केसमध्ये पोलिसांकडून बेपर्वाही; तपासी आधिकाऱ्याला समन्स

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील ठाणे ग्रामीणचे तपास अधिकारी व्यकंट आंधळे कोर्टाच्या सुनावणीमध्ये उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या विरोधात पनवेल कोर्टाने समन्स जारी केला आहे.
Negligence by police in Ashwini Bidre murder case; Summons to the investigating officer
Negligence by police in Ashwini Bidre murder case; Summons to the investigating officer

मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या केसमधील कोर्ट सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. पनवेल कोर्टात अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी चार आरोपी अटकेत असून यामध्ये लवकरच शिक्षा लागण्याची शक्यता आहे. मात्र पोलिस विभाग आणि 
तपास यंत्रणेकडून कोर्टात केस चालू असताना बेपर्वाही केली जात असल्याचा गंभीर आरोप सरकारी वकिल ॲड. प्रदीप घरत यांनी केला आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांडातील ठाणे ग्रामीणचे तपास अधिकारी व्यकंट आंधळे कोर्टाच्या सुनावणीमध्ये उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या विरोधात पनवेल कोर्टाने समन्स जारी केला आहे.

त्यांच्या विरूध्द बेलेबल वॉरंट काढण्यात आले असून यानंतरही सुनावणीला हजर न राहिल्यास कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. उलट त्यांच्या उपस्थितीवर संशय व्यक्त केला जात असल्याचा  आरोप प्रदीप घरत यांनी केला आहे. 

दरम्यान, दुसरीकडे नवी मुंबई पोलिसांकडून गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे हत्याकांडातील सरकारी वकिल ॲड. प्रदीप घरत यांना मानधन दिलेले नाही. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केले जातंय असे नाही, पण संबधित अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा म्हणता येईल. योग्य व्यक्तीचा आदर राखणे त्यांचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com