बिद्रे हत्याकांडातील महत्वाची साक्ष : मृतदेह लपविणारा तीन दिवस कोठे, यावर शिक्कामोर्तब

या खटल्याकडे पोलिस खात्याचे लक्ष
बिद्रे हत्याकांडातील महत्वाची साक्ष : मृतदेह लपविणारा तीन दिवस कोठे, यावर शिक्कामोर्तब
ashwini bidre

पनवेल : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे (API Ashwini Bidre murder) यांची ज्या दिवशी हत्या झाली, तेव्हापासून तीन दिवस कुंदन भंडारी याच्या मोबाईलचे लोकेशन मिरा रोडमध्ये व भाईंदर खाडीजवळ असल्याची साक्ष टाटा टेलिकम्युनिकेशनचे नोडल ऑफिसर बेबी जॉन यांनी शुक्रवारी पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात दिली. त्यामुळे कुंदन भंडारी हा अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली, त्यादिवशी व त्यानंतर दोन दिवस त्या भागात असल्याचे तसेच या हत्या प्रकरणात त्याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) सह अन्य आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी आपल्या मिरा रोड येथील फ्लॅटमध्ये अश्विनी बिद्रे यांची सायंकाळी हत्या केली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा कुरुंदकरचा खासगी वाहनचालक कुंदन भंडारी हा मिरा रोडमध्ये आला होता. त्यानंतर तो कुरुंदकरचा फ्लॅट असलेल्या परिसरात एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला. त्यानंतर कुंदन भंडारी याने अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे खाडीत टाकण्यासाठी एका दुकानातून जड लोखंडी वस्तू खरेदी केली होती. त्यानंतर १३ एप्रिलला पहाटे दीडच्या सुमारास ज्या ठिकाणाहून अश्विनीच्या मृतदेहाचे तुकडे गोणीत बांधून खाडीत टाकण्यात आले होते, त्या भाईंदरच्या खाडीजवळ कुंदन भंडारी हजर होता. हे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले होते.

दरम्यान, अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावणे व पुरावे नष्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा कुंदन भंडारी  हा टाटा टेलिकम्युनिकेशनचा मोबाईल फोन वापरत होता. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांची ज्या दिवशी हत्या झाली, तेव्हापासून तीन दिवस कुंदन भंडारी याच्या मोबाईलचे लोकेशन मिरा रोडमध्ये व भाईंदर खाडीजवळ असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले होते. याबाबत आज पनवेल सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, टाटा टेलिकम्युनिकेशनचे नोडल ऑफिसर बेबी जॉन यांनी आपली साक्ष नोंदविताना, कुंदन भंडारी याचे मोबाईल लोकेशन मिरा रोड व भाईंदर खाडीजवळ असल्याची माहिती दिली. त्यामुळे या हत्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बेबी जॉन यांची सर तपासणी घेतली. याप्रसंगी सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ११ ऑगस्टला होणार आहे

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in