मोदींना मारण्याच्या कटात मला गोवण्याचा प्रयत्न होता : प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

आंबेडकर यांच्या दाव्याने खळबळ उडण्याची शक्यता...
rakash Ambedkar
rakash Ambedkar

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Nareandra Modi) यांना मारण्याच्या कथित कटामध्ये मला गोवण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हा दावा केला. मला गोवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मी संबंधितांना इशारा दिला की मला तुम्ही गोवून दाखवा तुम्हाला युद्ध काय आहे ते दाखवून देतो, असेही आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.

तुमच्या राजकारणात विसंगती का दिसते. एकीकडे भाजपला विरोध करता आणि दुसरीकडे त्या पक्षाला फायदा होईल, अशी रणनीती आखता, अशा आशयाच्या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले की मी भाजपला मदत करतो, हा आमच्या राजकारणाला बदनामा करण्याचा डाव आहे. पाचशे कोटी मिळाले, तडजोडी केली, अशा कंड्या आमच्याविषयी पिकविल्या जातात. दुसरीकडे मोदी सरकारच्या दबावापुढे सारे राजकीय पक्ष दबून गेले आहेत. ते थेट भूमिका घेत नाहीत. मी थेट भूमिका घेतो. मी डागाळलेला नाही. त्यामुळे मोदी सरकार मला हात लावू शकत नाही. त्यामुळे मला पंतप्रधानांना मारण्याच्या कटात गोवण्याचा प्रयत्न झाला, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा दंगल, एल्गार परिषद तपासाच्या वेळी मोदी यांना मारण्याच्या कटाचा सुगावा लागला. त्यातून डाव्या चळवळीतील अनेकांना अटक करण्यात आली आहे. 

राजकारणातून जात हद्दपार होणार का या प्रश्नावर ते म्हणाले की राजकारणातून जात हद्दपार होणार नाही. कारण सारे पक्ष हे धर्म आणि जात मानणाऱ्या नेत्यांनी ताब्यात घेतले आहे. जात व धर्म हेच त्यांचे भांडवल आहे. अशा विचारसरणीच्या पक्षाला मतदार जोपर्यत बहिष्कार टाकत नाही तोपर्यंत जात जाणार नाही. वंचितांचे राजकारण कोणीच करत नाही. दोन-चार माळी, दोन-चार वंजारी आणि दहा- बारा धनगर राजकारणात दिसतात. लोहार, सुतार, लोणार यांना कोठेच स्थान दिसत नाही. आरक्षण नसत तर एससी, एसटी प्रवर्गालाही जागा मिळाल्या नसत्या. मी कुठल्याच धर्माच किंवा समाजाचं राजकारण करत नाही. व्यक्तीवर आधारीत म्हणून जे मुद्दे ते मी मांडत आहे. इव्हिएमबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केल्या. निवडणूक आयोग याबाबत पुरसे स्पष्टीकरण देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in