हवामान खात्याचा अंदाज चुकला; आता कृत्रिम पाऊस पाडा, मुख्यमंत्र्यांना पत्र..

आधीच कोरोना महामारीचा सामना करत शेतकऱ्यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पेरणी केली होती. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेली आहे.
Bjp Mp Raksha Khadse Letter to Cm Uddhav Thackeray News Jalgaon
Bjp Mp Raksha Khadse Letter to Cm Uddhav Thackeray News Jalgaon

जळगाव ः  संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात हवामान खात्याच्या वेधशाळेने अंदाज वर्तवल्यानूसार कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या सुरवातीपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली आहे. (The weather department's forecast was wrong; Now send artificial rain, letter to the Chief Minister) जुलै महिना उजाडला तरी अजून पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे पावसाअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे.  

शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध होणे तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न  होणे गरजेचे असल्याचे पत्र खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पाठवले आहे.(Bjp Mp Raksha Khdse Leeter to Cm Uddhav Thackeray)

वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीपासूनच जळगांव व बुलडाणा परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. (Agriculter Minister Dada Bhuse) परंतु पाहिजे तसा पाऊस जुलै उजाडला तरी झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

आधीच कोरोना महामारीचा सामना करत शेतकऱ्यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पेरणी केली होती. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेली आहे.
पावसा अभावी दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत खते व बियाणे उपलब्ध करावेत.

तसेच २०१५ साली महाराष्ट्र शासनाकडून कुत्रिम पाऊसाचा प्रयोग करण्यात आला होतो. तो बऱ्याच ठिकाणी यशस्वी देखील झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असेही रक्षा खडसे यांनी या पत्रात नमूद केले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com