रामकुंडासह मुख्य बाजारपेठेकडे जाणारे रस्ते बंद

नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट बनत चालली आहे. जिल्ह्यात साडेतीन ते चार हजार कोरोना रुग्ण दररोज आढळत आहेत.
Nashik Corona- Ramkund- Market Road Blocked News
Nashik Corona- Ramkund- Market Road Blocked News

नाशिक ः शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपुर्वी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन कोरोनाचे नियम नागरिकांनी पाळले नाही, तर चार एप्रिल पासून लाॅकडाऊन लागू शकतो, अशा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील स्वतंत्र बैठक घेऊन कोरोना नियम कडक करत बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी काही उपया योजना केल्या आहेत.

याचाच भाग म्हणून रामकुंडासह मुख्य बाजारपेठेकडे जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर बाजार पेठेतील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रति व्यक्ती प्रति तास पाच रुपये आकारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याशिवाय अनेक महत्वाचे निर्णय देखील जिल्हा प्रशासनाने घेतले आहेत. त्यामुळे वीरांची पारंपारिक मिरवणूक देखील पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट बनत चालली आहे. जिल्ह्यात साडेतीन ते चार हजार कोरोना रुग्ण दररोज आढळत आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे वारंवार आवाहन करून देखील परिस्थितीत काही सुधारणा होतांना दिसत नाहीत.

लाॅकडाऊनचा कठोर निर्णय घेण्याआधी जिल्हा प्रशासनाने बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी प्रति व्यक्ती प्रति तास पाच रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे.जेणेकरून आवश्यकता असेल तरच नागरिक बाजारपेठेत येतील. शिवाय एक तासापेक्षा अधिक वेळ कुणी बाजारपेठेत थांबला तर त्याला पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस कायदा ४३ अन्वये महापालिका आणि पोलिसांकडून संयुक्तपणे ही कारवाई  केली जाणार आहे.

या शिवाय शालिमार, नवापूरा, बादशाही कॉर्नर येथे पोलिसांकडून बॅरकेडिंग, महापालिकेच्या वतीने प्रत्येक पॉइंटवर टेंट लावण्यात येणार आहे. बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलिस स्टेशनकडून पास दिले जाणार असून पासधारकांनाच बाजारपेठेत प्रवेश असणार आहे. सकाळी ८ ते रात्री ८  पर्यंत पोलिस तैनात असणार आहेत, आठ नंतर कुणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com