काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून नाना पटोले करणार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरूवात..

आपल्या या राज्यव्यापी दौऱ्यात त्यांनी कॉंग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना स्वगृही परत आणण्याचे ठरविले आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशसुद्धा येत आहे. अमरावतीचे माजी आमदार आणि राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांची घरवापसी त्यांच्याच दौऱ्याचे फलित मानन्यात येत आहे.
Nana Patole
Nana Patole

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले Maharashtra state congress president Nana Patole उद्या बुधवार, २३ जूनपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर Tour of north maharashtra जात आहेत. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची ते सुरुवात कऱणार आहेत. धुळे, Dhule नंदुरबार Nandurbar आणि त्यानंतर नाशिक Nasik जिल्ह्याला भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा ते घेणार आहेत.

काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन संपन्न झालेल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे बुधवारी केंद्र सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्याच्या प्रतींचे दहन करून या दौ-याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ते शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात नाना पटोले या भागातील कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना भेट देतील. तसेच काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेणार आहेत. 

ठिकठिकाणी ते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे हेसुद्धा असतील. पटोले यांचा चार दिवसांचा दौरा जळगाव जिल्ह्यापासून सुरु होऊन २६ जून रोजी नाशिक येथे त्याची सांगता होईल. 

नाना पटोलेंच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या यापूर्वीच्या टप्प्यात त्यांनी विविध वक्तव्ये करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. बुलडाण्यावरून अकोला येथे असताना त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शीत केली होती. त्यानंतर राज्यभर विविध प्रतिक्रियी उमटल्या होत्या. या दौऱ्यात नानांनी ‘यापूढे कॉंग्रेस स्वबळावर लढेल’, हा नारा दिला होता. त्यावरही विविध चर्चा राज्यभर घडून आल्या. काहीसा वादग्रस्त म्हणावा, असा त्यांच्या दौऱ्याचा टप्पा राहीला होता. 

आपल्या या राज्यव्यापी दौऱ्यात त्यांनी कॉंग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना स्वगृही परत आणण्याचे ठरविले आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशसुद्धा येत आहे. अमरावतीचे माजी आमदार आणि राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांची घरवापसी त्यांच्याच दौऱ्याचे फलित मानन्यात येत आहे. एकंदरीतच काय तर त्यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसला एक करणे सुरू केले आहे. उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात ते आणखी कोणती नवी भूमिका जाहीर करतात, याकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com